पुण्यात अलीकडेच ६५ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत नांदेडच्या शिवराज राक्षेनं सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला हरवत मानाची गदा पटकावली. २६ व्या वर्षीय महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराजला १५ व्या वर्षीच कुस्ती कायमची सोडण्याचा विचार मनात आला होता. त्यावेळी कुस्ती खेळताना त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या जबड्याचं हाड मोडलं होतं. याबाबतचा एक प्रसंग शिवराजने सांगितला आहे.

खरं तर, शिवराज वयाच्या चौदाव्या वर्षी पुण्यातील आळंदी येथील एका तालमीत कुस्तीचा सराव करण्यासाठी आला होता. येथे त्याने दोन वर्षे सराव केला. दरम्यानच्या काळात कुस्ती खेळताना झालेल्या दुखापतीचा प्रसंग शिवराजने सांगितला आहे. तो ‘एबीपी माझा’च्या कार्यक्रमात बोलत होता.

Shatrughan Sinha condemns firing outside Salman Khan home
“या भ्याड हल्ल्याचा…”, शत्रुघ्न सिन्हांची सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराबद्दल प्रतिक्रिया; म्हणाले, “मला या…”
happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
Solapur, Son-in-law cuts mother-in-law finger,
सोलापूर : शिळे जेवण दिल्याच्या कारणावरून जावयाने वृद्ध सासूचे बोट छाटले
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

हेही वाचा- Maharashtra Kesari 2023: “माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सपण नाही…”, भेट मिळालेल्या महिंद्रा ‘थार’ विषयी शिवराजने केली मिश्कील टिप्पणी

दुखापतीच्या प्रसंग सांगताना शिवराज म्हणाला,”कुस्ती खेळताना मला अचानक दुखापत झाली होती. माझं जबड्याचं हाड मोडलं होतं. दोन महिने मला जबडा उघडताही येत नव्हता. तेव्हा मी फक्त ज्यूस प्यायचो. वयाच्या १५ व्या वर्षी ही घटना घडली. ही दुखापत झाल्यानंतर वाटलं की, मला पहिलवानकी नको… असे विचार मनात येत होते. पण आई-वडील आणि भावाने मला कधीही खचू दिलं नाही. त्यांनी वेळोवेळी मला प्रोत्साहन दिलं. त्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलो.”

हेही वाचा- “…म्हणून वडिलांनी एकही सामना बघितला नाही”, महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षेनं सांगितलं कारण, म्हणाला…

तो पुढे म्हणाला, “मी आठ-नऊ वर्षाचा असताना माझे वडील तालमीत जेवढी मेहनत घ्यायचे. तेवढीच मेहनत मी घ्यायचो. त्यावेळी मी एका दमात पाचशे जोर मारायचो. एवढ्या लहान वयात एवढे जास्त जोर मारताना पाहून वडिलांना माझ्यावरचा विश्वास वाढला. त्यामुळे त्यांनी मला आळंदीच्या तालमीत पाठवण्याचा निर्णय घेतला. त्या काळात ही तामील आमच्या परिसरात सगळ्यात चांगली तालीम मानली जात होती. तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल दिनेश गुंड होते. त्यांच्या हाताखाली शिकता यावं म्हणून मला आळंदीला पाठवलं होतं.”