वृत्तसंस्था, लेव्हरकूसेन

बायर लेव्हरकूसेन संघाने जर्मनीतील बुंडसलिगा फुटबॉल स्पर्धेत संपूर्ण हंगाम अपराजित राहण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. लेव्हरकूसेनने अखेरच्या सामन्यात ऑग्सबर्गवर २-१ असा विजय मिळवला.

Argentina beat Canada by 20 points in the first match
अर्जेंटिना संघाची दमदार सुरुवात; पहिल्याच सामन्यात कॅनडावर २० अशी सरशी; मेसीची चमक
Portugal beat Czech Republic football news
कॉन्सेसाओने पोर्तुगालला तारले! सलामीच्या लढतीत चेक प्रजासत्ताकवर संघर्षपूर्ण विजय
France is worried about captain Kylian Mbappe injury
फ्रान्सला एम्बापेच्या दुखापतीची चिंता; सलामीच्या लढतीत ऑस्ट्रियावरील विजयात नाकाला दुखापत
England victory over Serbia in the opening football match sport news
बेलिंगहॅमची लय कायम; इंग्लंडचा सलामीच्या लढतीत सर्बियावर संघर्षपूर्ण विजय
Italy won the Euro Football Championship sport news
इटलीचे विजयी पुनरागमन
A last minute 2 1 win over Poland in the Euro Football Championship sport news
वेघोर्स्ट नेदरलँड्सचा तारणहार; युरो फुटबॉल स्पर्धेत अखेरच्या क्षणी पोलंडवर २-१ने विजय
Iga Schwiotek continues his dominance as he advances to the French Open sport
श्वीऑटेकचे वर्चस्व कायम; कोकोला नमवत फ्रेंच स्पर्धेच्या अंतिम फेरीत
french open 2024
फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : श्वीऑटेकचा संघर्षपूर्ण विजय; ओसाकावर मात; सबालेन्का, सिन्नेर, मेदवेदेवचीही आगेकूच

स्पेनचा माजी मध्यरक्षक झाबी अलोन्सोच्या मार्गदर्शनाखालील लेव्हरकूसेन संघाने यंदाच्या हंगामात विविध स्पर्धात अनेक विक्रम मोडले आहेत. लेव्हरकूसेनने यंदा बुंडसलिगामध्ये संपूर्ण हंगाम अपराजित राहण्याची किमया साधली आणि अशी कामगिरी करणारा हा पहिलाच संघ ठरला. त्यांनी या स्पर्धेत २८ सामने जिंकले, सहा सामने बरोबरीत सोडवले आणि एकही पराभव पत्करला नाही. तसेच लेव्हरकूसेनच्या संघाने बायर्न म्युनिकच्या वर्चस्वालाही धक्का दिला आणि आपले पहिले बुंडसलिगा जेतेपद पटकावले.

हेही वाचा >>>IPL 2024 च्या प्लेऑफ्सचे चारही संघ ठरले! ‘क्वालिफायर वन’ आणि ‘एलिमिनेटर’ कोणत्या संघात होणार? जाणून घ्या

ऑग्सबर्गविरुद्धचा सामना संपल्यानंतर लेव्हरकूसेनला बुंडसलिगा विजेत्यांना मिळणारी ढाल देण्यात आली. त्यानंतर अलोन्सो आणि लेव्हरकूसेनचा कर्णधार लुकास हरडेस्की यांनी प्रेक्षकांत जाऊन जेतेपदाचा आनंद साजरा केला. ऑग्सबर्गविरुद्धच्या सामन्यात लेव्हरकूसेनसाठी व्हिक्टर बोनिफेस (१२व्या मिनिटाला) आणि रॉबर्ट अ‍ॅन्ड्रिच (२७व्या मि.) यांनी गोल नोंदवले. ऑग्सबर्गचा एकमेव गोल मेर्त कोमूरने (६२व्या मि.) केला.

लेव्हरकूसेनच्या संघाला या हंगामात सर्व स्पर्धात मिळून अपराजित राहण्याची संधी आहे. ते आता जर्मन चषक आणि युरोपा लीगच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे.