बुंडेसलिगा फुटबॉल : लेवांडोवस्कीमुळे बायर्न विजयी

बायर्नने सुरुवातीपासूनच आक्रमक शैलीत खेळ केला. तिसऱ्याच मिनिटाला लेवांडोवस्कीने गोल करत बायर्नला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

प्रमुख आक्रमणपटू रॉबर्ट लेवांडोवस्की आणि सर्ज गनाब्री यांनी केलेल्या प्रत्येकी दोन गोलच्या बळावर बायर्न म्युनिकने बुंडेसलिगा फुटबॉलच्या सामन्यात बायर लेव्हरकुसेनचा ५-१ असा धुव्वा उडवला. बायर्नचा हा आठ सामन्यांतील सहावा विजय ठरला.

बायर्नने सुरुवातीपासूनच आक्रमक शैलीत खेळ केला. तिसऱ्याच मिनिटाला लेवांडोवस्कीने गोल करत बायर्नला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानेच ३०व्या मिनिटाला बायर्नची आघाडी दुप्पट केली. मग बायर्नने तीन मिनिटांत तीन गोल करत मध्यंतराला ५-० अशी मोठी आघाडी मिळवली. थॉमस मुलर (३४वे मिनिट) आणि गनाब्री (३५ व ३७वे मि.) यांनी बायर्नचे गोल केले. उत्तरार्धात लेव्हरकुसेनचा एकमेव गोल पॅट्रिक शिकने (५५वे मि.) केला.

बार्सिलोनाचा चौथा विजय

बार्सिलोनाने ला लिगा फुटबॉलच्या सामन्यात व्हेलंसियावर ३-१ अशी मात केली. अंसू फाटी (१३वे मि.), मेम्फिस डिपे (४१ मि.), फिलिपे कुटिन्हो (८५ मि.) यांनी गोल केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bundesliga football lewandowski von bayern akp

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना
ताज्या बातम्या