scorecardresearch

भारतीय फुटबॉल महासंघाची ‘कॅग’कडून चौकशी

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) गेल्या चार वर्षांत केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची दखल आता थेट केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालयाकडून घेण्यात आली आहे.

पीटीआय, नवी दिल्ली : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) गेल्या चार वर्षांत केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची दखल आता थेट केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालयाकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे देशाचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) यांनी पथक नेमून अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या आर्थिक व्यवहारांचे सखोल लेखापरीक्षण करण्याचे निर्देश बुधवारी दिले.

‘‘आम्हाला यासंदर्भात कोणतेही पत्र प्राप्त झालेले नाही. लेखापरीक्षण झालेली आर्थिक ताळेबंद पत्रके सादर करणे ही सामान्य बाब आहे,’’ असे भारतीय फुटबॉल महासंघाकडून सांगण्यात आले. भारतीय फुटबॉल महासंघाच्या गेल्या चार आर्थिक वर्षांच्या कागदपत्रांचे लेखापरीक्षण करण्यासाठी ‘कॅग’ने एक पथक नेमले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cag inquiry indian football federation financial abuse allegations ysh