Cameron Green Praises Rohit Sharma: आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळून परतलेला ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने भारतीय कर्णधार रोहित शर्माचे कौतुक केले आहे. आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत ग्रीनने आयपीएलदरम्यान रोहित शर्मासोबत घालवलेल्या वेळेचा अनुभव शेअर केला. रोहितसोबत घालवलेला वेळ डब्ल्यूटीसी फायनलमध्ये उपयोगी पडेल,असे त्याने म्हटले आहे. ग्रीनने रोहितचे सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून वर्णन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहितसोबत घालवलेला वेळ चांगला होता –

आयसीसीसोबतच्या मुलाखतीत कॅमेरून ग्रीन म्हणाला, “मी रोहित शर्माला आयपीएलमध्ये धैर्याने खेळताना पाहिलेले स्पष्टपणे दिसते. गेल्या १० वर्षांपासून तो हे काम करत आहे. तिथे त्याच्यासोबत वेळ घालवणे आणि त्याच्याशी गप्पा मारणे खूप छान राहिले. त्याने मला संघातील माझ्या भूमिकेबद्दल खुप चांगल्या पद्धतीने सांगितले. त्याने मला फिरकी गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी कशी करायची आणि वेगवान गोलंदाजांवर हल्ला कसा करायचा, हे शिकवले.”

ग्रीनने आयपीएलमध्ये मुंबईसाठी चांगली कामगिरी केली –

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाचा भाग असलेला कॅमेरॉन ग्रीन म्हणतो की, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या डग-आऊटमध्ये भारतीय कर्णधारासोबत दर्जेदार वेळ घालवल्यानंतर रोहित शर्माची संयम या खेळात दिसून येईल अशी मला आशा आहे. कॅमेरून ग्रीनने आयपीएल २०२३ मध्ये मुंबईकडून खेळताना ५०.२२ च्या सरासरीने ४५२ धावा केल्या, त्यात शतकाचा समावेश आहे. गोलंदाजीतही त्याने ६ बळी घेतले.

हेही वाचा – Virender Sehwag: “आता माझे केस शोएब अख्तरच्या…”, पाकिस्तानच्या माजी खेळाडूला वीरेंद्र सेहवागने दिले चोख प्रत्युत्तर

ग्रीनकडून विराट कोहलीचेही कौतुक –

कॅमेरून ग्रीन गुरुवारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी त्याच्या टीममध्ये सामील झाला. तो प्रशिक्षण सत्रात उशीरा प्रवेश करणारा होता. आयपीएल २०२३ मध्ये, मुंबई इंडियन्सकडून खेळताना ग्रीनने रोहित शर्मासोबत बराच वेळ घालवला, परंतु डब्ल्यूटीसी फायनलमध्ये हे दोन खेळाडू एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी बनतील. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना त्याला जे काही शिकायला मिळाले, ते या सामन्यात अवलंबवण्याचा प्रयत्न करेल. रोहितचे कौतुक करताना कॅमेरून ग्रीनने विराट कोहलीचेही जोरदार कौतुक केले. तो म्हणाला की, तो ऑस्ट्रेलियासाठी नक्कीच मोठा धोका ठरू शकतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cameron green praised rohit sharma saying he taught me how to bat against spin and fast bowlers vbm
First published on: 04-06-2023 at 13:33 IST