Gautam Gambhir: कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल २०२४ चे जेतेपद पटकावले. सनरायझर्स हैदराबादचा एकतर्फी अंतिम सामन्यात मोठा पराभव करत तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावे केले. यंदाच्या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील कोलकाता संघाचे मार्गदर्शक म्हणून गौतम गंभीर होता. केकेआरच्या यंदाच्या हंगामातील कामगिरीचे श्रेय त्यालाही दिले जात आहे. गौतम गंभीरने केकेआरच्या संघातील एका खेळाडूचा किस्सा सांगितला.

गौतम गंभीरने स्टार अष्टपैलू सुनील नरेनचे खूप कौतुक करत त्याचा एक किस्सा सांगितला. नरेनची आयपीएल २०२४ चा मोस्ट व्हॅल्युएबल खेळाडू म्हणून निवड झाली. नुकत्याच झालेल्या संभाषणात, गंभीरने नरेनसोबतच्या त्याच्या मैत्रीबद्दल खुलासा केला आणि केकेआर कॅम्पमधील नरेनचे सुरुवातीचे दिवस कसे होते याच्याबद्दल त्याने सांगितेल. २०१२ आणि २०१४ मध्ये केकेआरने आयपीएलची ट्रॉफी जिंकली तेव्हा गंभीर केकेआरचा कर्णधार होता, नरेनने संघाच्या या दोन्ही विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.

yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Sourav Ganguly Tweet Adviced BCCI on Selecting New Coach of Team India
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा प्रक्षिक्षक होण्याच्या चर्चेदरम्यान गांगुलीने BCCI चे कान टोचले; म्हणाला, “थोडं समजुतदारपणे…”
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
Gautam Gambhir offered blank cheque by Shah Rukh Khan to be with KKR for 10 years
.. म्हणून गौतम गंभीरला शाहरुखने ब्लँक चेक दिला? BCCI मुळे केकेआरचं १० वर्षांचं गणित ‘असं’ बदलण्याच्या चर्चा
What Kiran Mane Said About Manusmruti?
“सुंदर स्त्री हीन जातीतली असली तरी तिला भोगण्यात…”, ‘मनुस्मृती’तलं वाक्य सांगत किरण मानेंची खरमरीत पोस्ट
Saurabh Netravalkar Straight Answer About Working After T20 World Cup
सुपर ८ फेरी गाठताच सौरभ नेत्रावळकरने कंपनीत केला कॉल; मॅचनंतर काम करण्याबाबत स्पष्टच म्हणाला, “मला कुणी त्रास..”
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”

हेही वाचा – न्यूयॉर्कमध्ये ‘ढगाला लागली कळ…’ भर पावसात रोहित-द्रविडची पळापळ, VIDEO व्हायरल

एका मुलाखतीत गंभीर म्हणाला- “नरेन आणि मी सारखेच आहोत. २०१२ मध्ये नरेन पहिल्यांदा आयपीएलमध्ये आला तेव्हा तो जयपूरमध्ये होता आणि आम्ही सरावासाठी जात होतो, हा प्रसंग मला अजूनही आठवतो. मी त्याला जेवायला यायला सांगितले होते. तो इतका लाजाळू होता की लंच दरम्यान तो एक शब्दही बोलला नाही आणि शेवटी त्याने पहिला प्रश्न विचारला- मी माझ्या गर्लफ्रेंडला आयपीएलमध्ये घेऊन येऊ शकतो का?”

गंभीरने पुढे नरेन त्याचा सहकारी नव्हे तर भाऊ असल्याचे तो म्हणाला. “पहिल्या सत्रात तो खूप शांत होता, पण आता आम्ही कोणत्याही विषयावर बोलू शकतो. तो माझ्यासाठी भावासारखा आहे. मी त्याच्याकडे एक मित्र किंवा सहकारी म्हणून पाहत नाही, मी त्याच्याकडे एक भाऊ म्हणून पाहतो.”

हेही वाचा – गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा प्रक्षिक्षक होण्याच्या चर्चेदरम्यान गांगुलीने BCCI चे कान टोचले; म्हणाला, “थोडं समजुतदारपणे…”

“जर मला तिची गरज असेल किंवा त्याला माझी गरज असेल तर मला असे वाटते की आम्ही फक्त कॉल दूर आहोत, आम्ही इतकं बॉन्डिंग निर्माण केलं आहे. आम्ही फार उत्साही होत नाही. आम्ही उघडपणे आमच्या भावनाही दाखवत नाही. आम्ही कसला दिखावादेखील करत नाही, आम्ही फक्त आमचे काम करतो आणि परत येतो.” असं गंभीरने नरेन आणि त्याच्या बॉन्डिंगविषयी बोलताना सांगितलं.

हेही वाचा – T20 WC 2024: “मी संघाचा कर्णधार आहे…”, रोहित शर्मा सर्वांसमोर कुलदीपला पाहा काय म्हणाला; VIDEO व्हायरल

“नरेन नेहमीच केकेआरचा मोस्ट व्हॅल्युएबल खेळाडू राहिला आहे. मी त्याच्याबद्दल काय सांगू? ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर’चा पुरस्कार जरी जिंकला नसता तरी तो आमच्यासाठी मोस्ट व्हॅल्युएबलच असता. तुम्ही त्याची आकडेवारी पाहा. हंगाम सुरू होण्यापूर्वीच तो केकेआरचा महत्त्वाचा खेळाडू होता. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून जगाने त्याची प्रतिभा पाहिली आहे आणि मला खात्री आहे की नरेनकडे अजूनही केकेआर आणि जागतिक क्रिकेटला देण्यासारखे बरेच काही आहे,” असे शेवटी बोलताना गंभीरने सांगितले.