टोरंटो : रोमानियाच्या सिमोना हालेपने ब्राझीलच्या बिएट्रिझ हदाद माइआला चुरशीच्या लढतीत पराभूत करत कॅनेडियन खुल्या टेनिस स्पर्धेचे तिसऱ्यांदा जेतेपद मिळवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हालेपने तीन सेटपर्यंत रंगलेल्या अंतिम लढतीत ६-३, २-६, ६-३ अशी सरशी साधली. पहिल्या सेटमध्ये हालेप ०-३ अशी पिछाडीवर होती. यानंतर पुनरागमन करत तिने हा सेट ६-३ असा जिंकला. प्रतिस्पर्धी हदादने जोरदार खेळ करत दुसरा सेट ६-२ असा आपल्या नावे केला. निर्णायक सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळाली. मात्र, हालेपने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत ६-३ अशी बाजी मारली आणि जेतेपद पटकावले.

या पराभवामुळे हदादची विजयी घोडदौड खंडित झाली. अंतिम फेरी गाठताना २६ वर्षीय हदादने अमेरिकन खुल्या स्पर्धेतील उपविजेती लैला फर्नाडेझ, जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेली इगा श्वीऑनटेक आणि टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या बेलिंडा बेन्चिचला नमवले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Canadian open final simona halep beats beatriz haddad maia zws
First published on: 16-08-2022 at 03:03 IST