रघुनंदन गोखले, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक
तब्बल १४ फेर्यांची ‘कँडिडेट्स’ स्पर्धा ही खेळाडूच्या निव्वळ खेळाचीच नव्हे, तर त्याच्या शारीरिक आणि मानसिक कणखरतेची परीक्षा पाहणारी असते असे नेहमी म्हटले जाते. यंदा सायप्रस येथे युद्धाच्या ढगांच्या सावलीत खेळली जाणारी ही बुद्धिबळ स्पर्धा विविध खेळाडूंच्या खेळाची कसोटी पाहत आहे. उझबेकिस्तानचा २० वर्षीय ग्रँडमास्टर जावोखिर सिंदारोव खुल्या गटाचे अजिंक्यपद दोन फेर्या राहिल्या असतानाच जवळजवळ खिशात घालून आहे, तर महिला गटात ड्टाारताच्या वैशालीला नमवून चिनी झू जिनेर तिच्या बरोबरीने आघाडीवर आली आहे.
तेराव्या फेरीत अनिश गिरी अग्रक्रमी सिंदारोवविरुद्ध खेळणार आहे. गिरीला हाच डाव नव्हे, तर अखेरची फेरीही जिंकावी लागेल आणि त्याच वेळी वेई यीकडून सिंदारोव हरला पाहिजे. या कल्पनेतही असंड्टाव वाटणार्या गोष्टी घडल्या तरच अनिश विरुद्ध सिंदारोव अशी टायब्रेकर होईल.
वैशाली आणि दिव्या देशमुख या स्पर्धेतील सर्वांत खालच्या मानांकित खेळाडू होत्या. तरी दिव्याने विश्वचषक जिंकल्यामुळे तिच्याकडून जास्त आशा होत्या. वैशालीला विजेतेपदाच्या शर्यतीत कोणीही गंड्टाीरपणे धरत नव्हते. परंतु वैशाली एक झुंजार खेळाडू आहे आणि मागे पडलेली असताना ती जास्त धोकादायक असते. याच तिच्या विजिगीषू वृत्तीचा आता कस लागणार आहे. तिची गाठ पडणार आहे ती १२व्या फेरीत आपल्या पहिल्या विजयाची नोंद करणार्या चिनी टॅन झोंगयीशी! टॅनने काळ्या मोहर्यांकडून खेळताना ड्टाारताच्या विश्वचषक विजेत्या दिव्या देशमुखला नमवले.
कोनेरू हम्पीच्या अनुपस्थितीमुळे ऐन वेळी स्पर्धेत उतरलेल्या ॲना मुझिचुकने १२व्या फेरीत हातातोंडाशी आलेला विजय आपल्या ६५व्या चालीमुळे घालवला. ६४ चाली अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करणार्या मुझिचुकने एका घोडचुकीमुळे रशियन गोर्याचकिनाला पोलादी पकडीतून निसटू दिले. नाही तर आज मुझिचुक पण वैशाली आणि झू यांच्याबरोबर आघाडीवर असती.
पहिल्या फेरीत अनिश गिरीला सुंदर खेळून नमविणार्या प्रज्ञानंदला त्यानंतर अजूनही आपला दुसरा विजय मिळालेला नाही. माझ्या मते याचे कारण त्याचा तिसर्या फेरीतील सिंदारोवविरुद्ध झालेला पराड्टाव! आपल्याहून चार महिन्यांनी लहान असलेल्या सिंदारोवने एका घोड्याचा बळी देऊन प्रज्ञानंदला हादरवले. त्या पराड्टावातून प्रज्ञानंद अजून सावरलेला दिसत नाही. खरे तर प्रज्ञानंदच्या प्रतिड्टोला सिंदारोवचा हल्ला परतवणे काही कठीण नव्हते. पण विजेप्रमाणे कोसळलेल्या या हल्ल्याला प्रज्ञानंदला तेव्हा तोंड देता आले नाही हे खरे.
बाराव्या फेरीत दिव्याला नमवून आलेल्या टॅनबरोबर आता वैशालीची गाठ आहे. दिव्याचा पराड्टाव करून गोर्यचकिना पुढल्या फेरीत वैशालीला ड्टिाडली, त्या वेळी वैशालीने तिला सहज नमवले होते. गंमत म्हणजे गोर्याचकिनाचा स्पर्धेतील पहिला विजय दिव्याविरुद्ध होता, तर टॅनला पण आपला पहिला विजय नोंदवायला थकलेल्या दिव्याचा आधार मिळाला होता. महिला गटातील चुरस आता शिगेला पोहोचली असून वैशाली आपल्या प्रतिड्टोला कसा न्याय देते ते विश्रांतीच्या दिवसानंतर कळेलच!
