Captain Cool's special plan for India's World Cup win will repeat history.avw 92 | Loksatta

आगामी विश्वचषकासाठी माहीचा जबरदस्त प्लॅन, २०११च्या विश्वचषकाची पुनरावृत्ती होणार

भारतीय संघाचा माजी कर्णधार असलेल्या एमएस धोनीबद्दल सोशल माध्यमांवर सीएसके मधून निवृत्तीची अफवा पसरली होती पण ती चुकीची ठरली आहे.

आगामी विश्वचषकासाठी माहीचा जबरदस्त प्लॅन, २०११च्या विश्वचषकाची पुनरावृत्ती होणार
सौजन्य- ट्विटर

भारतीय संघातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंग धोनीने शनिवारी सोशल माध्यमांवर एका पोस्टद्वारे सांगितले होते की, तो आज म्हणजेच रविवारी एक मोठी घोषणा करणार आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्जमधून निवृत्तीची घोषणा करणार असल्याचे सोशल माध्यमांवरील चाहत्यांच्या वक्तव्यानंतर अफवा पसरल्या होत्या, पण धोनीच्या लाइव्ह आल्यानंतर ही अफवा खोटी ठरली आहे. कारण धोनीने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

रविवारी दुपारी दोन वाजता थेट लाइव्ह येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. माजी कर्णधार लाइव्ह आणि त्याच्या चाहत्यांच्या संख्येवरून तुम्ही अंदाज लावू शकता की जेव्हा धोनी लाइव्ह आला तेव्हा लाखो लोक त्याला फेसबुकवर पाहत होते. बिस्किट कंपनी ओरियाच्या भारतातल्या पहिल्या लॉन्चसाठी धोनी आला होता. याआधी धोनी आणि त्याची मुलगी झिवा यांनीही या कंपनीच्या जाहिराती केल्या आहेत. त्याच्या बाबतीत सांगायचे झाल्यास एमएस धोनी १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला, तरीही तो अजूनही फ्रँचायझी क्रिकेट खेळत आहे आणि आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आहे.

धोनी म्हणतो की, हे बिस्किट २०११ मध्ये भारतात आले तेव्हा टीम इंडियाने विश्वचषक जिंकला. आता पुन्हा एकदा ओरियो भारतात लाँच होत आहे, त्यामुळे या वेळेचा टी२० विश्वचषकही आपणच जिंकणार आहे. धोनीने केसांची रचना तशीच ठेवली आहे, तो विनोद असला तरी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा कोणतीही पत्रकार परिषद घेतली नव्हती.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Ind vs Aus 3rd T20: भारतीय संघ आज हैदराबादमध्ये कांगारूंना देणार धोबीपछाड, कसे असेल हवामान आणि खेळपट्टी जाणून घ्या…

संबंधित बातम्या

..तर IPL खेळू नका, जे पैसे मिळतात ते..; रोहित शर्माच्या बालपणीच्या प्रशिक्षकांनी सुनावले खडेबोल
… म्हणून यंदा ऑस्ट्रेलियाचा संघ स्लेजिंग करत नाही; सेहवागने रहस्य उलगडले
IND vs SA: ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिकेला हरविण्यासाठी टीम इंडिया सज्ज; जाणून घ्या संपूर्ण माहिती
IND vs NZ ODI Series: न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका तुम्हाला या चॅनलवर live पाहता येणार तेही अगदी निशुल्क
विश्लेषण: फुटबॉलमध्ये ‘ऑफसाइड’ म्हणजे काय? २०२२ ‘फिफा’ विश्वचषकात कोणते तंत्रज्ञान वादग्रस्त ठरत आहे?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
सीआरपीएफ जवानाच्या गोळीबारात दोन सहकारी ठार
FIFA World Cup 2022: पोलंडचा सौदी अरेबियावर विजय; लेवांडोवस्कीची चमक
देविकाचा ऑलिम्पिक पदकाचा ध्यास!
India New Zealand ODI Series: सलामीवीरांकडून आक्रमकतेची अपेक्षा!
FIFA World Cup 2022: ऑस्ट्रेलियाची टय़ुनिशियावर मात