scorecardresearch

मेसीमुळे अर्जेटिनाची जमैकावर मात

कर्णधार लिओनेल मेसीने केलेल्या दोन गोलच्या बळावर अर्जेटिनाने मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात जमैकावर ३-० अशी मात केली.

मेसीमुळे अर्जेटिनाची जमैकावर मात
कर्णधार लिओनेल मेसी

हॅरिसन : कर्णधार लिओनेल मेसीने केलेल्या दोन गोलच्या बळावर अर्जेटिनाने मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात जमैकावर ३-० अशी मात केली. अर्जेटिनाचा संघ आता सलग ३५ सामने अपराजित आहे. या सामन्यात अर्जेटिनाने सुरुवातीपासून तुलनेने दुबळय़ा जमैकावर वर्चस्व गाजवले. १३व्या मिनिटाला ज्युलियन अल्वारेझने अर्जेटिनाचे गोलचे खाते उघडले. अर्जेटिनाने एका गोलची आघाडी मध्यंतराला कायम राखली. त्यानंतर ५६व्या मिनिटाला मेसीचे बदली खेळाडू म्हणून मैदानात प्रवेश केला. त्याने ८६ आणि ८९व्या मिनिटाला गोल करत अर्जेटिनाला हा सामना ३-० अशा फरकाने जिंकवून दिली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या