एकदिवसीय मालिकेत झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला एका विकेटने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात देखील बांगलादेशने ५ धावांनी विजय मिळवत मालिका खिशात टाकली. या सामन्यात रोहित शर्मा् बांगलादेशची फलंदाजी सुरु असताना दुसऱ्या षटकात झेल घेण्याच्या प्रयत्नात दुखापतग्रस्त झाला. मात्र तरी तो फलंदाजीसाठी आला त्याने झुंजार अर्धशतक करत २८ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या. मात्र त्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांगलादेशच्या डावातील दुसऱ्याच षटकात स्लीपमध्ये झेल घेण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माच्या बोटाला दुखापत झाली. त्याला तातडीने मैदान सोडवा लागलं अन् स्कॅनसाठी हॉस्पिटल मध्ये दाखल व्हावं लागलं. काही वेळानंतर तो ड्रेसिंग रुममध्ये परतला तो डाव्या बोटाला पट्टी बांधून… आता रोहित या सामन्यात काही खेळत नाही असे दिसत असल्याने विराट व शिखर ही जोडी सलामीला आली. पण, संघाची सातवी विकेट पडली अन् रोहितने मैदानावर फलंदाजीला उतरण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या धाडसाचे साऱ्यांनीच कौतुक केले.

क्षेत्ररक्षण करताना रोहितच्या हाताला चेंडू लागल्यामुळे मैदानातून बाहेर जावे लागले होते. मात्र फलंदाजी करण्यासाठी त्याने पुनरागमन केले. रोहित काही तास मैदानाच्या बाहेर थांबल्यानंतर भारतासाठी ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. सामन्याच्या शेवटच्या षटकात चाहत्यांना रोहित शर्मा विरुद्ध मुस्तफिजूर रहमान असा जबरदस्त थरार पाहायला मिळाला. विजयासाठी भारताला शेवटच्या दोन चेंडूंवर १२ धावांची आवश्यकता होती. रोहितने पाचव्या चेंडूवर षटकार कुटला, मात्र शेवटच्या चेंडूवर त्याला षटकार मारता आला नाही.

भारताचे ६ फलंदाज १८९ धावांवर माघारी परतले होते आणि विजयासाठी त्यांना ११.४ षटकांत ८३ धावा करायच्या होत्या. दीपक चहर फलंदाजीला आला, सोबत शार्दूल ठाकूर होता. शार्दूल ७ धावांवर बाद झाला आणि भारताला विजयासाठी ४२ चेंडूंत ६४ धावा करायच्या होत्या. अशात रोहित मैदानावर आला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. बांगलादेशचे चाहते मात्र टेंशनमध्ये आले. बोट दुखत असूनही रोहितने ४६व्या षटकात इबादतला ६,६,४ असे धुतले.

रोहितने त्यासोबतच एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. तो भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. रोहितच्या ५०० आंतरराष्ट्रीय षटकारांची संख्या केवळ वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेल आहे, ज्याच्याकडे ५३३ षटकार आहेत. इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाकडे ४०० पेक्षा जास्त षटकार नाहीत. ३५९ षटकारांसह एमएस धोनी भारतीय खेळाडूंमध्ये रोहितच्या सर्वात जवळ आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Captain rohit sharma came to bat at number 10 for team india despite a serious finger injury all the fans applauded him avw
First published on: 07-12-2022 at 21:25 IST