भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्या मुलीबद्दल सोशल मीडियावर अशोभनीय टिप्पणी करण्यात आली होती. ही टिप्पणी काही दिवसापूर्वी करण्यात आली होती. ज्यावर आता आयएफएसओ दिल्ली पोलिसांनी अशोभनीय टिप्पणी करणाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. याबाबत दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी याबाबत एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती.

स्वाती मालीवाल यांनी एफआयआरची प्रत त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर शेअर करत दिली. स्वाती मालीवाल यांनी ट्विटरवर लिहिले – “माझ्या नोटीसनंतर, दिल्ली पोलिसांनी विराट कोहली आणि एमएस धोनीच्या मुलींवर केलेल्या अशोभनीय टिप्पणी प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. लवकरच सर्व आरोपींना अटक करून तुरुंगात टाकले जाईल.”

Dindori lok sabha election 2024, Communist Party of India (Marxist), jiva pandu gavit
दिंडोरीत कार्यकर्त्यांच्या दबावामुळे माकप उमेदवार उभा करणार
uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ
arvind kejriwal
‘आप’चे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न; केजरीवाल यांच्या सुटकेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान वकिलाचा दावा

यासोबतच कर्णधार रोहित शर्माच्या कुटुंबाविरोधात केलेल्या असभ्य टिप्पणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही स्वाती मालीवाल यांनी सांगितलं आहे. सर्व ट्रोल्सना चेतावणी, तुमचे मार्ग सुधारा नाहीतर DCW सुधारेल. स्पेशल सेलच्या IFSO युनिटने विराट कोहली, धोनी आणि रोहित शर्मा यांच्या कुटुंबीयांवर सोशल मीडियावर केलेल्या टिप्पणीबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – IND vs SL Series: विराट कोहलीला मालिकावीराचा पुरस्कार देण्यावर गौतम गंभीरने घेतला आक्षेप; म्हणाला, ‘त्याला …’

धोनी आणि कोहलीच्या मुली आणि त्यांच्या पत्नींबद्दल सोशल मीडियावर अनेक अशोभनीय टिप्पणी करण्यात आल्याची माहिती आहे. यापूर्वी स्वाती मालीवाल यांनी काही कॉमेंटचे अस्पष्ट स्क्रीनशॉट पोस्ट केले होते. त्याने स्क्रीनशॉट पोस्ट करताना लिहिले. काही अकाऊंट्स ट्विटरवर देशातील दोन मोठे खेळाडू विराट कोहली आणि धोनी यांच्या मुलींचे फोटो पोस्ट करून अश्लील टिप्पणी करत आहेत. २ वर्षाच्या आणि ७ वर्षाच्या मुलीबद्दल अशा ओंगळ गोष्टी? तुम्हाला एखादा खेळाडू आवडत नसेल तर तुम्ही त्याच्या मुलीबद्दल अशी टिप्पणी करणार का? असे स्वाती यांनी म्हटले होते.