Premium

पत्नीच्या तक्रारीनंतर माजी क्रिकेटपटू विनोद कांबळींवर गुन्हा दाखल

भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्यावर त्यांच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत.

vinod kambli and wife andrea
विनोद कांबळी आणि पत्नी अँड्रिया (फोटो- लोकसत्ताग ग्राफिक्स टीम)

भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्यावर त्यांच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. मद्यप्राशन करून विनोद कांबळी यांच्याकडून मारहाण तसेच शिवीगाळ केल्याचे कांबळी यांच्या पत्नी अँड्रिया यांनी म्हटले आहे. याच कारणामुळे अँड्रिया यांनी कांबळी यांच्याविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनीही कांबळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> भारताला पंत, बुमराची उणीव जाणवेल! ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिका जिंकण्याची संधी असल्याचे ग्रेग चॅपल यांचे मत

विनोद कांबळी यांच्यावर आरोप काय?

दाखल तक्रारीनुसार वांद्रे पोलिसांनी कांबळी यांच्याविरोधात भारतीय दंडविधानातील ३२४, ५०४ या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विनोद कांबळी यांनी कुकिंग पॅन (स्वयंपाकासाठीचे एक भांडे) फेकून मारल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. या घटनेत अँड्रिया यांच्या डोक्याला जखम झाली आहे. दारुच्या नशेत कांबळी यांनी हे कृत्य केल्याचा दावा केला जातोय. मद्यप्राशन करून त्यांच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये हा प्रकार घडला. हे प्रकरण मिटल्याचेही कांबळी यांच्या पत्नीने सांगितले आहे.

हेही वाचा >>>Court on Ayesha Mukherjee: शिखर धवनची पत्नी आयेशाला कोर्टाने सुनावलं; धवनच्याविरुद्धात ‘या’ गोष्टी करण्यास केली मनाई

१२ वर्षांच्या मुलासमोर पत्नीला मारहाण

पत्नीला मारहाण करताना घटनास्थळी कांबळी यांचा १२ वर्षीय मुलगा उपस्थित होता. त्याने वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र रागाच्या भरात कांबळी यांनी त्यांच्या पत्नीच्या अंगावर कुकिंग पॅन फेकून मारला. दरम्यान, मारहाणीच्या घटनेनंतर विनोद कांबळी यांच्या पत्नीवर उपचार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Case registered against former cricketer vinod kambli for abusing and harassing wife andrea prd

First published on: 05-02-2023 at 10:06 IST
Next Story
Court on Ayesha Mukherjee: शिखर धवनची पत्नी आयेशाला कोर्टाने सुनावलं; धवनच्याविरुद्धात ‘या’ गोष्टी करण्यास केली मनाई