नव्याने संघबांधणीचे आफ्रिकेपुढे आव्हान

जॅक कॅलिसच्या रूपात द. आफ्रिकेला अनुभवी फलंदाजी प्रशिक्षकही लाभला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

द. आफ्रिका-इंग्लंड कसोटी मालिका

यंदाचे वर्ष हे दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघासाठी फारच निराशाजनक ठरले. डेल स्टेन, हशिम अमला यांच्यानंतर व्हर्नन फिलँडरही निवृत्तीच्या उंबरठय़ावर असताना इंग्लंडविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत नव्याने संघबांधणी करण्याचे आव्हान आफ्रिकेपुढे उभे ठाकले आहे.

फॅफ डय़ू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आफ्रिकन संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी काही दिवसांपूर्वीच मार्क बाऊचरची नियुक्ती करण्यात आली. त्याशिवाय जॅक कॅलिसच्या रूपात त्यांना अनुभवी फलंदाजी प्रशिक्षकही लाभला आहे. त्यामुळे मायदेशात आफ्रिका इंग्लंडला कडवे आव्हान देणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

* सामन्याची वेळ : दुपारी १.३० वा.

* थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Challenge of the new alliance with africa abn

ताज्या बातम्या