मेसीने संघ सोडल्यानंतर पहिलाच पराभव

बार्सिलोना : रॉबर्ट लेवान्डोवस्की आणि थॉमस मुलर यांनी केलेल्या गोलच्या जोरावर बायर्न म्युनिकने युएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या सलामीच्या सामन्यात बार्सिलोनावर ३-० अशी मात केली. आघाडीचा खेळाडू लिओनेल मेसी संघातून बाहेर पडल्यानंतर बार्सिलोनाचा हा यंदाच्या मोसमातील पहिलाच पराभव ठरला.

बायर्नने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. दोन्ही संघांना ठराविक वेळ चेंडूवर ताबा मिळवण्यात यश आले. पूर्वार्धात ३४व्या मिनिटाला मुलरने गोल करत बायर्नला १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात लेवान्डोवस्कीने ५६व्या आणि ८५व्या मिनिटाला दोन गोलची भर घातल्याने बायर्नने हा सामना आरामात जिंकला. बार्सिलोनाचा हा चॅम्पियन्स लीगमध्ये घरच्या मैदानावरील सलग तिसरा पराभव ठरला.

’  रोमेलू लुकाकूच्या गोलमुळे चेल्सीने झेनितचा १-० असा पराभव केला.

’  युव्हेंटसने माल्मोवर ३-० अशी मात केली.

’  यंग बॉईजने मँचेस्टर युनायटेडला २-१ असे पराभूत केले.