scorecardresearch

चॅम्पियन्स लीग फुटबॉल : चेल्सीचा दमदार विजय; युव्हेंटसची बरोबरी

गतविजेत्या चेल्सीने मंगळवारी मध्यरात्री चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये दमदार विजयाची नोंद केली.

काए हॅवर्ट्झ

एपी, लंडन : गतविजेत्या चेल्सीने मंगळवारी मध्यरात्री चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये दमदार विजयाची नोंद केली. उपउपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्यातील लढतीत प्रमुख आक्रमणपटू रोमेलू लुकाकूच्या अनुपस्थितीतही चेल्सीने लिली संघाचा २-० असा पराभव केला.

घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणाऱ्या चेल्सीसाठी काए हॅवर्ट्झ आणि ख्रिस्टियन पुलिसिच यांनी अनुक्रमे आठव्या आणि ६३व्या मिनिटाला गोल नोंदवले. गतवर्षी हॅवर्ट्झनेच मँचेस्टर सिटीविरुद्धच्या अंतिम फेरीत निर्णायक गोल केला होता. लुकाकूला या लढतीत बदली खेळाडू म्हणूनही न पाठवता पूर्णपणे विश्रांती देण्यात आली. आता चेल्सी-लिली यांच्यातील उपउपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील लढत १७ मार्च रोजी होईल.

अन्य लढतीत, व्हिलारेयालने युव्हेंटसला १-१ असे बरोबरीत रोखले. प्रथमच चॅम्पियन्स लीगमध्ये खेळणाऱ्या दुसान लॅहोव्हिचने युव्हेंटससाठी पहिल्याच मिनिटाला गोल झळकावला. परंतु डॅनी पॅरेजोने ६०व्या मिनिटाला गोल साकारून व्हिलारेयालला बरोबरी साधून दिली. ख्रिस्तियानो रोनाल्डोने युव्हेंटस सोडल्यापासून या संघाची कामगिरी सातत्याने ढासळत चालली आहे. इटलीचे नामांकित खेळाडू युव्हेंटसमध्ये असूनही त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Champions league football chelsea win equal juventus ysh

ताज्या बातम्या