पॅरिस : रेयाल माद्रिद आणि लिव्हरपूल हे माजी विजेते व युरोपीय फुटबॉलमधील बलाढय़ संघ शनिवारी ‘युएफा’ चॅम्पियन्स लीगच्या अंतिम लढतीत समोरासमोर येणार आहेत. या दोन संघांमध्ये २०१८चा अंतिम सामना झाला होता आणि त्यात रेयालने लिव्हरपूलचा ३-१ असा पराभव करत विक्रमी १३व्यांदा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद मिळवले होते. त्यामुळे यंदा त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी लिव्हरपूलचा संघ प्रयत्नशील आहे. मात्र, सातव्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी लिव्हरपूलला रेयालचा तारांकित आघाडीपटू करीम बेन्झिमाला रोखावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेन्झिमाने यंदा चॅम्पियन्स लीगमध्ये वर्चस्वपूर्ण कामगिरी करताना ११ सामन्यांत १५ गोल झळकावले आहेत. तसेच त्याने बाद फेरीत १० गोल करत ख्रिस्टियानो रोनाल्डोच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. आता त्याचे पॅरिस येथे होणाऱ्या अंतिम सामन्यातही दर्जेदार खेळ करण्याचे लक्ष्य असेल. लिव्हरपूलची भिस्त मोहम्मद सलाह आणि सादिओ माने या आघाडीपटूंवर आहे.

  •   वेळ : मध्यरात्री १२.३० वा.
  •   थेट प्रक्षेपण :  सोनी टेन २, ३ (संबंधित एचडी वाहिन्या)
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Champions league football liverpool challenge to stop benzema ysh
First published on: 28-05-2022 at 00:02 IST