scorecardresearch

चॅम्पियन्स लीग फुटबॉल : लिव्हरपूल अंतिम फेरीत

उपांत्य फेरीतील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात दोन गोलच्या पिछाडीनंतर पुनरागमन करत लिव्हरपूलने मंगळवारी व्हिलारेयालला ३-२ असे पराभूत करत एकूण ५-४ अशा गोलफरकासह चॅम्पियन्स लीग फुटबॉलची अंतिम फेरी गाठली.

एपी, व्हिलारेयाल (स्पेन) : उपांत्य फेरीतील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात दोन गोलच्या पिछाडीनंतर पुनरागमन करत लिव्हरपूलने मंगळवारी व्हिलारेयालला ३-२ असे पराभूत करत एकूण ५-४ अशा गोलफरकासह चॅम्पियन्स लीग फुटबॉलची अंतिम फेरी गाठली. लिव्हरपूलने उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात २-० असा विजय मिळवला. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात व्हिलारेयालचे पहिल्या सत्रातच दोन गोल करत लिव्हरपूलवरील दडपण वाढवले. पण, लिव्हरपूलने दुसऱ्या सत्रात जोरदार पुनरागमन करत तीन गोल करत सामना जिंकला.

व्हिलारेयालकडून बॉलाये डिया (चौथ्या मिनिटाला) आणि फ्रान्सिस कोक्युलिन (४१वे मि.) यांनी गोल करीत मध्यांतरापर्यंत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात लिव्हरपूल संघावर चांगली कामगिरी करण्याचा दबाव होता. फॅबिन्होने ६२ व्या मिनिटाला प्रतिस्पर्धी संघाच्या गोलरक्षकाला चकवत गोल केला. यानंतर बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेला लुइस डायझने (६७वे मि.) अलेक्झांडर-आर्नोल्डच्या सहाय्याने गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. यानंतर सादियो मानेने (७४वे मि.) गोल झळकावत संघाला निर्णायक आघाडी मिळवून दिली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Champions league football liverpool in the final defeated match ysh

ताज्या बातम्या