रेनान लोदीने केलेल्या गोलच्या जोरावर अ‍ॅटलेटिको माद्रिदने चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात मँचेस्टर युनायटेडला १-० असे पराभूत केले. त्यामुळे ख्रिस्तियानो रोनाल्डोचा समावेश असलेल्या युनायटेड संघाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

या दोन संघांमधील पहिल्या टप्प्याचा सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील सामना घरच्या मैदानावर खेळणाऱ्या युनायटेडचे पारडे जड मानले जात होते. मात्र, मंगळवारी मध्यरात्री झालेल्या या सामन्यात युनायटेडने निराशाजनक खेळ केला. अ‍ॅटलेटिकोचा भक्कम बचाव भेदण्यात त्यांना अपयश आले.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: १२ वर्षांनी शतक तरीही सेलिब्रेशन नाही, रोहित शर्माचा सामन्यानंतरचा व्हीडिओ चाहत्यांना करतोय भावुक
Attack on Israel by terrorist groups
इराणच्या नेतृत्वात हिजबुल्ला, हुथी अन् पॅलेस्टिनी दहशतवादी गट एकत्र; इस्रायल हल्ले कसे रोखणार?
Vidit Gujarathi defeated Hikaru Nakamura in the Chess Candidates competition sport news
विदितचा नाकामुराला धक्का; गुकेशचा प्रज्ञानंदवर विजय; हम्पीची सलग दुसरी बरोबरी
RBI bank
रिझर्व्ह बँकेकडून का सुरू आहे सोने खरेदी? गव्हर्नर दास यांनी दिली ही कारणे…

अ‍ॅटलेटिकोने प्रतिहल्ल्यांवर भर दिला आणि याचा फायदा त्यांना ४१व्या मिनिटाला मिळाला. अँटोन ग्रीझमनच्या पासवर लोदीने गोल करत अ‍ॅटलेटिकोला आघाडी मिळवून दिली. यानंतर युनायटेडने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोनाल्डोला सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश आले. त्याला गोलवर एकही फटका मारता आला नाही. राफाएल वरानने मारलेला फटका अ‍ॅटलेटिकोचा गोलरक्षक यान ओब्लाकने अप्रतिमरीत्या अडवल्याने युनायटेडची गोलची पाटी कोरीच राहिली.

बेन्फिकाची आगेकूच

अ‍ॅम्टरडॅम : डार्विन नूनेझच्या गोलमुळे बेन्फिकाने चॅम्पियन्स लीगच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात आयएक्सला १-० असे नमवले. डार्विनने या सामन्यात ७७व्या मिनिटाला गोल केला. त्यामुळे बेन्फिकाने दोन टप्प्याअंती ही लढत एकूण ३-२ अशा फरकाने जिंकत स्पर्धेत आगेकूच केली.