चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीआधीच अंतिम फेरीचा थरार चाहत्यांना अनुभवता येणार आहे. स्पॅनिश लीगमधील अव्वल रिअल माद्रिद आणि गतविजेता बायर्न म्युनिक यांच्यात उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्याचा सामना मंगळवारी बायर्नच्या घरच्या मैदानावर रंगणार आहे. रिअल माद्रिदविरुद्ध घरच्या मैदानावर एकही सामना न गमावल्यामुळे बायर्न म्युनिकचे पारडे या सामन्यात जड मानले जात आहे.
करिम बेंझेमाच्या एकमेव गोलमुळे पहिल्या टप्प्यात रिअल माद्रिदने बायर्न म्युनिकवर १-० असा विजय मिळवला होता. त्यामुळे अंतिम फेरीत मजल मारण्यासाठी बायर्नला विशेष कामगिरी करावी लागणार असली तरी इतिहास त्यांच्याच बाजूने आहे. बायर्नने घरच्या मैदानावर रिअल माद्रिदविरुद्ध आठ सामने जिंकून एक सामना बरोबरीत सोडवला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोने शनिवारी दोन गोल झळकावत आपण म्युनिकविरुद्धच्या सामन्यासाठी आपण पूर्णपणे सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.

संभाव्य संघ :
रिअल माद्रिद – आयकर कसिल्लास (गोलरक्षक, कर्णधार), पेपे, सर्जीओ रामोस, फॅबियो कोएन्ट्राओ, ख्रिस्तियानो रोनाल्डो, करिम बेंझेमा, झाबी अलोन्सो, डॅनियल कार्वाजाल, ल्युका मॉड्रिक, अँजेल डी मारिया, इस्को, दिएगो लोपेझ, राफेल वराने, गॅरेथ बॅले, मार्सेलो, कॅसेमिरो, अल्वारो मोराटा, एसियर इरालामेंडी, प्रशिक्षक : कालरे अँकलोट्टी.
बायर्न म्युनिक  – मॅन्युएल न्यूएर (गोलरक्षक), फिलिप लॅम (कर्णधार), डान्टे, फ्रँक रिबरी, मारियो मान्झुकिक, आर्येन रॉबेन, राफिन्हा, जेरोम बोएटेंग, डेव्हिड अलाबा, बास्तियन श्वाइनस्टायगर, टोनी क्रूस, लिओपोल्ड झिंगेरले, जावी मार्टिनेझ, क्लॉडियो पिझ्झारो, मारियो गोएट्झे, मिचेल वेईसर, थॉमस म्युलर, लुकास रेईडर, प्रशिक्षक : पेप गार्डिओला.

ठिकाण :
अलायन्झ एरिना, म्युनिक.

चॅम्पियन्स लीगचे जेतेपद
रिअल माद्रिद :
(१९५५-५६, १९५६-५७, १९५७-५८,
१९५७-५९, १९५९-६०, १९६५-६६,
१९९७-९८, १९९९-२०००, २००१-०२)
बायर्न म्युनिक : ५
(१९७३-७४, १९७४-७५, १९७५-७६,
२०००-०१, २०१२-१३)

आमने-सामने
सामने        रिअल        बायर्न        बरोबरी
२१               ८               ११               २
गोल           २७              ३३