Champions Trophy Pakistan Former Cricketer Tweet Goes Viral: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. २०२५ च्या सुरूवातीला ही स्पर्धा पाकिस्तानात खेळवली जाार आहे. पण भारतीय संघ ही आयसीसी स्पर्धा खेळण्यासाठी भारतात जाणार नसल्याचे म्हटले जात आहे. बीसीसीआयला चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवायची आहे, पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मात्र सर्व सामने त्यांच्याच देशात खेळवायचे आहे, यावरून अद्याप या स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित झालेले नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही याबाबत काही वक्तव्य केलेले नाही. पण यादरम्यान पाकिस्तानच्या माजी खेळाडूने ट्विट करत असं काही वक्तव्य केलं आहे की खळबळ उडाली आहे.

भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येणार नसल्याने पाकिस्तानचे काही माजी दिग्गज खेळाडू भडकले आहेत. जावेद मियांदाद, इंझमाम उल हक, मोहसीन खान, रशीद लतिफ यांनी याबाबत वक्तव्य करत राग व्यक्त केला तर काहींनी भारताची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. भारतीय संघ पाकिस्तानात सुरक्षित आहे, असे या माजी खेळाडूंनी सांगितले पण मोहम्मद हाफिजने सत्यपरिस्थितीची पाकिस्तानला जाणीव करून दिली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा – Champions Trophy: “भारत-पाकिस्तान सामनाच नाही झाला तर…”, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी येणार नसल्याने BCCI, ICCवर संतापले जावेद मियांदाद

मोहम्मद हफिजने ट्विट करत सांगितले की, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात येईल असं तुम्हाला वाटतं असेल तर हे दिवसा स्वप्न पाहण्यासारख आहे. पाकिस्तान ही आयसीसी स्पर्धा आयोजित करण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आणि सज्ज आहे. पाकिस्तान या स्पर्धेसाठी प्रत्येक संघाचे आदरातिथ्य करू शकतो पण का माहित नाही भारतासाठी हे सुरक्षित नाही. पाकिस्तान सरकार आणि पीसीबी कडून एक चकित करणारा आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल याची प्रतिक्षा आहे.

हेही वाचा – IND vs SA: “आता उभा राहून मजा बघ…”, हार्दिक पंड्याला मोठेपणा करणं पडलं भारी, अर्शदीपला बोललेल्या वाक्यानंतर होतोय ट्रोल

२००८ मधील आशिया कपनंतर भारतीय संघ पाकिस्तानात एकही सामना खेळण्यासाठी गेलेला नाही. पाकिस्तानचा संघ २०१६ साली टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आला होता, याशिवाय २०१२2१३ मध्ये पाकिस्तानी संघ ४ सामन्यांची वनडे आणि ४ सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी आला होता. दोन्ही संघांमधील ही अखेरची द्विपक्षीय मालिका होती. तर गेल्यावर्षी वर्ल्डकप २०२३ साठीही पाकिस्तान संघ भारतात आला होता.२००८ मधील आशिया कपनंतर भारतीय संघ पाकिस्तानात एकही सामना खेळण्यासाठी गेलेला नाही. पाकिस्तानचा संघ २०१६ साली टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आला होता, याशिवाय २०१२-१३ मध्ये पाकिस्तानी संघ ४ सामन्यांची वनडे आणि ४ सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी आला होता. दोन्ही संघांमधील ही अखेरची द्विपक्षीय मालिका होती. तर गेल्यावर्षी वर्ल्डकप २०२३ साठीही पाकिस्तान संघ भारतात आला होता.

हेही वाचा – Gautam Gambhir on KL Rahul: “केएल राहुलसारखे खेळाडू किती देशात आहेत?”, गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?

पीसीबीने रविवारी स्पष्ट केले की, भारताने पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याबद्दल आयसीसीला कळवले आहे. नक्वी यांनी यापूर्वीच या स्पर्धेसाठी ‘हायब्रीड मॉडेल’मध्ये सामने खेळवण्यास नकार दिला आहे.

पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘मोहसीन नक्वी सरकारी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून आता पंतप्रधान शाहबाज शरीफ काय सूचना देतात याची आम्ही वाट पाहत आहोत.’ आयसीसीच्या प्रतिष्ठित स्पर्धेदरम्यान पाकिस्तानने येथे भेट देणाऱ्या संघांना पूर्ण सुरक्षा देण्याचे आश्वासन देऊनही भारताच्या भूमिकेबद्दल अधिकाऱ्यांनी निराशा व्यक्त केली. ते म्हणाले, ‘हे अस्वीकार्य आहे कारण भारताने आपला संघ पुन्हा पाकिस्तानला पाठवण्यास नकार देण्याचे कोणतेही तार्किक कारण नाही.’

Story img Loader