जोहान्सबर्ग : चौफेर फटकेबाजीने गोलंदाजांना धडकी भरवणारा, विश्वातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आणि तितकाच लोकप्रिय अशी ख्याती असलेल्या एबी डीव्हिलियर्सने शुक्रवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा केला. 

२०१८मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या ३७ वर्षीय डीव्हिलियर्सने निवृत्तीच्या संदेशात डीव्हिलियर्सने खास हिंदी भाषेतही ‘‘धन्यवाद’’ म्हणत भारतीय चाहत्यांची मने जिंकली.

‘‘इथवरचा प्रवास अविश्वसनीय होता. परंतु आता मी क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. घराच्या अंगणात मोठ्या भावांसह क्रिकेट खेळण्यापासून ते अगदी आतापर्यंत मी सारख्याच उत्साहाने आणि आनंदात खेळलो. मात्र वयाच्या ३७व्या वर्षी पूर्वीसारखी ऊर्जा राहिलेली नाही, हे सत्य मला स्वीकारावे लागेल,’’ असे डीव्हिलियर्स म्हणाला. ‘आयपीएल’मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुसाठी १५६ सामन्यांत त्याने ४,४९१ धावा केल्या.