scorecardresearch

Premium

CSK vs KKR: शानदार..जबरदस्त…! चेन्नईच्या डु प्लेसिसनं सीमेवर घेतला अप्रतिम झेल; पाहा VIDEO

फाफ डुप्लेसिसनं सीमेवर अप्रतिम झेल पकडला आणि मॉर्गनला तंबूचा रस्ता दाखवला.

Faf-Du-Plesis-Catch
चेन्नईच्या डु प्लेसिसनं सीमेवर घेतला अप्रतिम झेल (Photo- Twitter Video Grab)

आयपीएल २०२१ स्पर्धेत कोलकाता विरुद्ध चेन्नई यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात कोलकात्याचा कर्णधार मॉर्नगनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शुबमन गिल बाद झाल्यानंतर संघावर दडपण आलं. अंबाती रायडूने जबरदस्त क्षेत्ररक्षण करत त्याला धावचीत केलं. शुबमन गिलने ५ चेंडूत ९ धावा केल्या. यात २ चौकारांचा समावेश आहे. शुबमन गिलनंतर वेंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांनी संघाचा डाव सावरला. मात्र संघाची धावसंख्या ५० असताना वेंकटेश अय्यर बाद झाला. त्याने १५ चेंडूत १८ धावा केल्या. यात ३ चौकारांचा समावेश आहे. शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने त्याचा झेल घेतला. कर्णधार इऑन मॉर्गनही खेळपट्टीवर जास्त वेळ तग धरू शकला नाही. १४ चेंडूत ८ धावा करून तंबूत परतला.

इऑन मॉर्गननं जोश हेझलवुडच्या गोलंदाजीवर उंच फटका मारला. हा चेंडू सीमापलीकडे जाईल असा अंदाज होता. मात्र फाफ डुप्लेसिसनं सीमेवर अप्रतिम झेल पकडला आणि मॉर्गनला तंबूचा रस्ता दाखवला.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

चेन्नई- एमएस धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, सुरेश रैना, अंबाती रायडू, मोइन अली, रविंद्र जडेजा, सॅम करेन, फाफ डुप्लेसिस, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, जोश हेजलवूड

कोलकाता- इऑन मॉर्गन (कर्णधार), शुबमन गिल, वेंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, सुनील नरेन, लॉकी फर्ग्यूसन, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chennai faf du plesis took kkr morgan catch at the border rmt

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×