Chennai Super Kings vs Rajasthan Royals, Playing XI Prediction: आयपीएल २०२६ स्पर्धेला जोरदार सुरूवात झाली आहे. स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना राजस्थान रॉयल्स संघाविरूद्ध होणार आहे. हा दोन्ही संघांचा या हंगामातील पहिलाच सामना असणार आहे. स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्ज संघाला २ मोठे धक्के बसले आहेत. एमएस धोनी आधीच दुखापतीमुळे बाहेर झाला होता. आता स्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिस दुखापतग्रस्त असल्याने पहिल्या सामन्याला मुकणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे प्लेईंग ११ मध्ये कोणाला संधी द्यायची हा मोठा प्रश्न असणार आहे. दरम्यान राजस्थान रॉयल्स संघाविरूद्ध होणाऱ्या सामन्यात कशी असू शकते चेन्नई सुपर किंग्ज संघाची प्लेईंग ११? जाणून घ्या.

माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने चेन्नई सुपर किंग्ज संघाची प्लेईंग ११ निवडली आहे. या प्लेईंग ११ मध्ये त्याने आयुष म्हात्रेला हमखास खेळवा, असा सल्ला दिला आहे. ऋतुराज गायकवाडने काही दिवसांपूर्वी चेन्नईच्या सलामी जोडीबाबत खुलासा केला होता. यानुसार, ऋतुराज आणि संजू सॅमसन सलामीला येणार असं सांगण्यात आलं. पण आकाश चोप्राच्या मते, संजू सॅमसन आणि आयुष म्हात्रेने सलामीला यावं. तर ऋतुराज गायकवाडने मधल्या फळीत फलंदाजी करावी. डेवाल्ड ब्रेव्हिस बाहेर झाल्यामुळे सर्फराज खानला संधी देण्यात यावी,असा सल्ला देखील त्याने दिला आहे.

शिवम दुबे या संघातील सर्वात अनुभवी फलंदाज आहे. त्यामुळे त्याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. आकाश चोप्राच्या मते, उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, प्रशांत वीर आणि जेमी ओव्हरटनचा देखील प्लेईंग ११ मध्ये समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. आता ऋतुराज गायकवाड पहिल्या सामन्यासाठी कोणत्या ११ खेळाडूंना संधी देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हा सामना गुवाहाटीतील बारसापरा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक ७ वाजता होईल.

राजस्थान रॉयल्स संघाविरूद्ध होणाऱ्या सामन्यासाठी अशी असू शकते चेन्नई सुपर किंग्ज संघाची प्लेईंग ११:

संजू सॅमसन (यष्टीरक्षक), आयुष म्हात्रे, ऋतुराज गायकवाड, उर्विल पटेल/ सर्फराज खान, कार्तिक शर्मा, शिवम दुबे, प्रशांत वीर, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, मॅट हेनरी, खलिल अहमद