चेन्नईयनच्या एलानो ब्लमरला अटक

रात्री उशिरा एलानो याला अटक करण्यात आली.

इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) दुसऱ्या हंगामाचे जेतेपद जिंकणाऱ्या चेन्नईयन एफसी क्लबला विजयाचा आनंद फार काळ साजरा करता आला नाही. एफसी गोवाचे सहमालक दत्तराज साळगावकर यांना मारहाण केल्याप्रकरणी चेन्नईयनचा प्रमुख खेळाडू ब्राझीलचा एलानो ब्लमरला स्थानिक पोलिसांनी अटक केली. थोडय़ा वेळानंतर त्याची जामिनावर सुटकाही झाली. रविवारी मडगाव येथील स्टेडियमवर झालेल्या आयएसएलच्या अंतिम सामन्यात चेन्नईयनने ३-२ अशा फरकाने एफसी गोवाचा पराभव करून जेतेपद पटकावले. त्यानंतर रात्री उशिरा एलानो याला अटक करण्यात आली. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश विन्सेंट सिल्वा यांनी त्याची जामिनावर सुटका केली आणि देश सोडून जाण्यास परवानगीही दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chennaiyin fc captain elano blumer arrested