चेन्नई : महाराष्ट्राचा बुद्धिबळपटू संकल्प गुप्ता भारताचा ७१वा ‘ग्रँडमास्टर’ ठरला आहे. सर्बिया येथे झालेल्या स्पर्धेत ६.५ गुणांसह दुसरे स्थान पटकावत त्याने ‘ग्रँडमास्टर’ किताबासाठी आवश्यक निकष साध्य केले.१८ वर्षीय संकल्पने २४ दिवसांत सलग तीन स्पर्धा खेळत ‘ग्रँडमास्टर’ ठरण्यासाठी तीन निकष पूर्ण केले. या तिन्ही स्पर्धात त्याने कामगिरीचे २५९९ किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवले. तसेच सर्बिया येथे झालेल्या स्पर्धेदरम्यान त्याने २५०० एलो गुणांचा टप्पा गाठला. ‘ग्रँडमास्टर’चा किताब पटकावण्यासाठी खेळाडूने २५०० एलो गुण आणि तीन निकष (नॉर्म) पूर्ण करणे गरजेचे असते.

Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
Piyush Goyal on Elon Musk Tesla
टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? पियुष गोयल यांचं ‘मनोज कुमार’ स्टाइल हटके उत्तर
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
Wardha Lok Sabha
राष्ट्रवादी २५ वर्षांनंतर पुन्हा वर्ध्याच्या रिंगणात