scorecardresearch

Premium

चेतेश्वर पुजाराचं क्रिकेट करिअर संपलं? टीम इंडियातून डच्चू मिळालेल्या पुजाराने स्पष्टच सांगितलं, म्हणाला, “स्वत:ला सिद्ध…”

भारतीय कसोटी क्रिकेट संघातून बाहेर झाल्यानंतर चेतेश्वर पुजाराने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Cheteshwar Pujara On Indian Test Cricket Team
टीम इंडियातून बाहेर पडल्यानंतर चेतेश्वर पुजाराने दिली प्रतिक्रिया. (Image-Indian Express)

Cheteshwar Pujara Statement On Indian Test Cricket Team : भारताच्या कसोटी संघातून बाहेर पडणं, हा एक एक निराशाजनक अनुभव होता, अलं अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने म्हटलं आहे. ३५ वर्षीय या फलंदाजाला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात स्थान मिळालं नव्हतं. भारतासाठी १०३ कसोटी खेळणाऱ्या पुजाराने राष्ट्रीय संघासाठी द ओवल मैदानात ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला. या सामन्यात त्याने १४ आणि २७ धावा केल्या होत्या.

पुजाराने फायनल वर्ड पॉडकास्टशी बोलताना म्हटलं, “मागील काही वर्षात चढ-उतार पाहायला मिळाले. एक खेळाडूच्या रुपात ही एकप्रकारची परीक्षा असते. कारण ९० हून अधिक कसोटी सामने खेळल्यानंतरही मला स्वत:ला आताही सिद्ध करावं लागतं. मला आताही सिद्ध करावं लागतं की, या जागेवर राहण्याचा मला हक्का आहे. हे एक वेगळ्या प्रकारचं आव्हान आहे. टीममधून बाहेर झाल्यानंतर कधी कधी मला अस्थिर झाल्यासारखं वाटतं. ९० हून अधिक कसोटी सामने खेळून आणि पाच-सहा हजार धावा केल्यानंतर स्वत:ला सिद्ध करावं लागत आहे. हे सोपं नाहीय. खरंच तुम्ही सक्षम आहात का? कधी कधी अशाप्रकारची शंकाही मनात येते. इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये ससेक्सकडून खेळणाऱ्या पुजाराने म्हटलं, जर तुम्हाला सतत स्वत:ला सिद्ध करावं लागत असेल, तर तुम्ही विचार कराल की, असं करणं गरजेचं आहे का.”

uddhav thackeray on bjp
भाजपा नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश; उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “हुकूमशाहीची वळवळ…”
ICC World Cup Pakistan Team Saffron Bhagava on Babar Azam Shaheen Afridi Haris Rauf Check Out Funniest Memes Trending
“पाकिस्तानच्या खांद्यावर भगवा..”, भारतात आलेल्या बाबर आझम, शाहीनचे फोटो बघून ‘मीमर्स’ झाले लोटपोट
Shreyas Iyer and Shubman Gill's confusion in the video
IND vs AUS 1st ODI: श्रेयस अय्यर की शुबमन गिल, चूक कोणाची? रनआउटवर उपस्थित झाले प्रश्न, रैना-मिश्राने दिले ‘हे’ उत्तर
IND vs SL: I'm going to be 35 so I have to take care of my body more Why did Virat Kohli say this before the match against Sri Lanka
IND vs SL, Asia Cup: “मी ३५ वर्षांचा होणार आहे, त्यामुळे मला…” श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहली असं का म्हणाला?

नक्की वाचा – ODI World Cup 2023: टीम इंडियाच्या ‘गंभीर’ परिस्थितीवर गौतमने दिली प्रतिक्रिया, शास्त्रींचा समाचार घेत म्हणाला, “डावखुरे फलंदाज…”

पुजाराने घरेलू क्रिकेटच्या सामन्यांत तीन शतक ठोकले आहेत. सौराष्ट्रच्या या फलंदाजाने दुलीप ट्रॉफीत पश्चिम क्षेत्राकडून खेळताना मध्य क्षेत्राविरोधात १३३ धावा केल्या. त्यांनी वनडे कपमध्ये ससेक्सकडून नॉर्थम्पटनशर आणि समरसेटविरोधात अनुक्रमे नाबाद १०६ आणि ११७ धावा केल्या. पुजाराने पुढं बोलताना म्हटलं, मला माहित आहे की, मी भारतीय क्रिकेटला ज्या प्रकारे योगदान दिलं आहे, ते पाहता मला अजूनही खूप योगदान द्यायचं आहे. काही वेळेपूर्वी मला सांगण्यात आलं होतं की, जेव्हा मी भारतीय टीमसाठी ७० किंवा ८० हून अधिक धावा केल्या. त्यावेळी जवळपास ८० टक्के वेळा भारताचा विजय झाला. संघात निवड होण्याबाबत मी विचार करत नाही. माझं लक्ष चांगली कामगिरी करण्यावर असणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cheteshwar pujara biggest reaction after getting dropped from indian test cricket team squad team india latest news update nss

First published on: 22-08-2023 at 21:18 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×