scorecardresearch

Premium

SOM vs SUS: चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये चमकला; शानदार शतक झळकावत दिले परतीचे संकेत

Cheteshwar Pujara century : चेतेश्वर पुजाराने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या देशांतर्गत वनडे कप स्पर्धेत ससेक्सकडून खेळताना सॉमरसेटविरुद्ध ११७ धावा केल्या. त्याने आपल्या या खेळीत ११ चौकार मारले.

Cheteshwar Pujara scores a century in England,
चेतेश्वर पुजारा (फोटो-संग्रहित छायाचित्र जनसत्ता)

Cheteshwar Pujara’s century against Somerset : डब्ल्यूटीसी फायनल २०२३ नंतर टीम इंडियातून वगळले होते. त्यानंतर चेतेश्वर पुजाराने इंग्लंडमध्ये शानदार शतक झळकावत फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले आहेत. खरंतर, पुजाराने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या देशांतर्गत वनडे चषक स्पर्धेत ससेक्सकडून खेळताना शानदार शतक झळकावले आहे. त्याच्या शतकामुळे ससेक्सने सॉमरसेटचा ४ विकेट्सने पराभव केला. सलग तीन सामने गमावल्यानंतर ससेक्सचा हा पहिला विजय ठरला. ब गटात ससेक्स तळाशी आहे.

पुजाराने आपल्या खेळीत लगावले ११ चौकार –

कूपर असोसिएट्स कौंटी मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सॉमरसेट संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ६ गडी गमावून ३१८ धावा केल्या. सॉमरसेटकडून स्कॉटलंडच्या अँड्र्यू होप (११९) आणि कर्टिस कॅम्फर (१०१) यांनी शतके झळकावली. प्रत्युत्तरात ससेक्स संघाने ४८.१ षटकांत ३१९ धावांचे लक्ष्य पार केले. ससेक्ससाठी पुजाराने ११३ चेंडूत ११७ धावा करून नाबाद राहिला आणि संघाला विजयाकडे नेले. पुजाराने आपल्या खेळीत ११ चौकार मारले.

World Cup 2023: In Hyderabad Pakistani cricketers ate biryani took selfies with fans watch the video
Pakistan Team: हैदराबादमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी मारला बिर्याणीवर ताव, चाहत्यांबरोबर घेतले सेल्फी, पाहा Video
Cricket field became a war arena Bangladeshi players beat each other with bats 6 people admitted to hospital
Cricket Fight: क्रिकेट सामन्याचे WWE मध्ये रूपांतर, बॅट अन् स्टंपने तुफान हाणामारी, सहा खेळाडू गंभीर जखमी; पाहा Video
A stunning comeback Shreyas Iyer's amazing catch by Shaun Abbott and the umpire gives not out Watch the video
IND vs AUS 2nd ODI: जबरदस्त पुनरागमन! श्रेयस अय्यरचा शॉन अ‍ॅबॉटने पकडला अप्रतिम झेल अन् अंपायरने दिले नॉटआऊट; पाहा Video
ICC Rankings: No. 1 Team India India's dominance in all three formats of cricket Only two teams in the world managed this feat
ICC Rankings: एकच नंबर! क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा बोलबाला, जगात फक्त दोन संघांना जमला हा पराक्रम

पुजाराचे लिस्ट ए मध्ये झळकावले १६ वे शतक –

या खेळीद्वारे चेतेश्वर पुजाराने टीम इंडियात पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. आपल्या शतकी खेळीमुळे चेतेश्वर पुजाराने लिस्ट ए मध्ये ५५०० धावा पूर्ण केल्या आहेत. हे त्याचे लिस्ट ए कारकिर्दीतील १६ वे शतक होते. पुजाराने आतापर्यंत १२१ लिस्ट ए सामन्यांमध्ये ५८.४८ च्या प्रभावी सरासरीने ५५५६ धावा केल्या आहेत. पुजाराने या फॉरमॅटमध्ये ३३ अर्धशतकेही झळकावली आहेत. याशिवाय पुजाराची लिस्ट ए मध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च सरासरी आहे.

हेही वाचा – विराट कोहलीने चाहत्याला दिला पुढच्या वेळी सेल्फी देण्याचा शब्द, VIDEO होतोय व्हायरल

इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून पुजाराला वगळले –

चेतेश्वर पुजारा सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले आहे. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पुजारा फ्लॉप ठरला होता. या सामन्यात त्याने केवळ २१ धावा केल्या. एवढेच नाही तर मागील १० कसोटी सामन्यांमध्ये पुजाराच्या बॅटमधून केवळ एक अर्धशतक झळकले. या फ्लॉप कामगिरीनंतर पुजाराला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून वगळण्यात आले. त्याच्या जागी यशस्वी जैस्वालची संघात निवड करण्यात आली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cheteshwar pujara scored a century against somerset while playing for sussex in england vbm

First published on: 12-08-2023 at 14:16 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×