मुंबई : मुंबई शहर विरुद्ध अमरावती, अहमदनगर विरुद्ध वाशीम अशा पुरुषांत, तर पुणे विरुद्ध नागपूर, मुंबई शहर विरुद्ध अमरावती अशा महिलांतील लढतीने ‘२१व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक’ वरिष्ठ गट पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात होईल. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जळगांव जिल्हा कबड्डी संघटनेच्या यजमानपदाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

जळगांव येथील सागर पार्क मैदानावर ११ ते १४ मार्च या कालावधीत महाराष्ट्रातील दोन कबड्डी संघटनांतील १६-१६ जिल्ह्याच्या संघात ही स्पर्धा रंगेल. या स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही विभागांत महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या संघांनी वर्चस्व राखले आहे. यंदाच्या स्पर्धेत विदर्भ जिल्ह्यातील संघांनीदेखील जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे स्पर्धेत चुरस पाहायला मिळेल.

madhurimaraje chhatrapati
प्रचाराच्या धकाधकीत मधुरिमाराजे छत्रपतींनी क्रिकेटचा घेतला आस्वाद; संभाजीराजेंनी मारली नदीत डुबकी
220 former corporators of Kolhapur with the support of Shrimant Shahu Maharaj Chhatrapati
कोल्हापुरातील २२० माजी नगरसेवक श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या पाठीशी
Sunil Gavaskar's reaction to Surya
MI vs RR : मुंबईला पराभवाच्या हॅट्ट्रिकनंतर ‘या’ गेम चेंजरची भासत आहे उणीव, माजी दिग्गज सुनील गावसकरांचे वक्तव्य
Shahu Maharaj celebrated Rangpanchami with ex-servicemen
माजी सैनिकांसमवेत शाहू महाराजांनी साजरी केली रंगपंचमी