scorecardresearch

West Bengal: ममता बॅनर्जींची मोठी घोषणा! आता सौरव गांगुली बंगालचा नवा ब्रँड ॲम्बेसेडर

World Bengal Business Conference : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सौरव गांगुलीला बंगालचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषित केले. यापूर्वी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान बंगालचा ब्रँड ॲम्बेसेडर होता. जागतिक बंगाल बिझनेस कॉन्फरन्स दरम्यान ममता बॅनर्जी यांनी ही घोषणा केली.

Sourav Ganguly in World Bengal Business Conference
सौरव गांगुली बंगालचा नवा ब्रँड अॅम्बेसेडर (फोटो-एक्स अॅप)

Mamata Banerjee appointed Sourav Ganguly as the brand ambassador of West Bengal : पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारने माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवली आहे. गांगुलीला राज्याचा ब्रँड ॲम्बेसेडर नियुक्त करण्यात आले आहे. ते यापूर्वी बंगाल क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयचे अध्यक्ष होते. बंगाल ग्लोबल बिझनेस समिटमध्ये बोलताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, “सौरव गांगुली खूप लोकप्रिय व्यक्ती आहे आणि तो तरुण पिढीसाठी खूप चांगले काम करू शकतो. मला त्यांचा बंगालचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून समावेश करायचा आहे.”

जागतिक बंगाल व्यवसाय परिषदेला मंगळवारी राज्यात सुरुवात झाली. रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी, सौरव गंगोपाध्याय ते देशातील आघाडीचे उद्योगपती या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. यावेळी मुकेश अंबानी यांनी मोठ्या गुंतवणुकीबद्दल सांगितले. आज ममता बॅनर्जींनी मंचावरून मोठी घोषणा केली.

union minister dharmendra pradhan in pune, india won 100 medals due to fit india, fit india and khelo india
फिट इंडिया, खेलो इंडियामुळे देशाला शंभर पदके, भारताच्या कामगिरीवर धर्मेंद्र प्रधान यांचे भाष्य
Ojas Deotale from Nagpur praised by devendra Fadnavis
सुवर्णपदक विजेता नागपूरच्या ओजसचे फडणवीसांकडून कौतुक
Nagaland Minister Temjen Imna Along enjoyed Panipuri
नागालँडचे मंत्री पुन्हा चर्चेत! पाणीपुरीचा घेतला आनंद; स्ट्रीट फूडसाठी व्यक्त केलं प्रेम…
Zaka Ashraf's Controversial Statement About India
Zaka Ashraf: “दुश्मन मुल्क में…”, पाकिस्तानचा संघ भारतात पोहोचताच पीसीबी अध्यक्षांनी ओकली गरळ, पाहा VIDEO

खरेतर, सौरव गांगुली देखील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या १२ दिवसांच्या स्पेन आणि दुबई दौऱ्यावर गेलेल्या शिष्टमंडळाचा एक भाग होता. मंगळवारी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे कौतुक करण्यासाठी महाराज मंचावर उभे राहिले. सौरव म्हणाला की, ‘दीदी मला प्रत्येक चांगल्या प्रसंगी बोलवतात. त्याच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. कधीकधी मला समजत नाही की त्या मला का बोलवतात? पण या सन्मानाने मी भारावून गेलो आहे.’

हेही वाचा – IND vs AUS Final: मॅक्सवेलच्या पत्नीला ट्रोल करणार्‍यांवर हरभजन सिंग संतापला; म्हणाला, “खेळाडूंच्या कुटुंबीयांना…”

जागतिक बंगाल व्यवसाय परिषदेत सौरव गांगुली वेगळ्याच शैलीत दिसला. मंचावर सौरवला उद्योगपती म्हणून नवीन पदवी मिळाली. बंगालच्या भूमीवर गुंतवणुकीचे महाराजांचे वचन यापूर्वीही ऐकले होते. अशा परिस्थितीत सौरवने सातव्या जागतिक बंगाल बिझनेस कॉन्फरन्सच्या मंचावर ममता बॅनर्जींचे कौतुकही केले. बंगालमधील पश्चिम मेदिनीपूर येथील सालबोनी येथे स्टील प्लांट उभारणार असल्याची घोषणा महाराजांनी ममता बॅनर्जी यांच्या स्पेन भेटीच्या व्यासपीठावरून केली होती.

हेही वाचा – U-19 World Cup 2024 : आयसीसीने १९ वर्षांखालील विश्वचषकाचे यजमानपद श्रीलंकेकडून काढून घेतले, आता ‘या’ देशात होणार स्पर्धा

सौरव गांगुली हा देशातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याला दादा म्हणूनही ओळखले जाते. याची दोन कारणे आहेत. पहिला म्हणजे तो बंगालचा आहे, जिथे मोठ्या भावाला दादा म्हणतात. त्यामुळे सर्व चाहते त्याला मोठा भाऊ मानून दादा म्हणतात. याशिवाय गांगुलीने टीम इंडियाचा कर्णधार असताना दादा म्हणून खूप लोकप्रिय झाला. त्यानी भारतीय संघाला विरोधी संघाच्या डोळ्यात बघून प्रत्युत्तर द्यायला शिकवले. यानंतर भारतीय संघ खऱ्या अर्थाने त्याच्या नेतृत्वाखाली लढायला शिकला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chief minister mamata banerjee appointed sourav ganguly as the brand ambassador of west bengal vbm

First published on: 21-11-2023 at 21:05 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×