scorecardresearch

Chris Gayle: १७५ धावांचा विक्रम कोण मोडणार? स्वत: ख्रिस गेलने सांगितले ‘या’ खेळाडूचे नाव

Chris Gayle on KL Rahul: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे, पण त्याचा विक्रम कोणता भारतीय फलंदाज मोडू शकतो हे त्याने सांगितले.

Chris Gayle on KL Rahul
ख्रिस गेल (फोटो-संग्रहित छायाचित्र लोकसत्ता)

वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू ख्रिस गेल हा T20 फॉरमॅटचा अनुभवी क्रिकेटर आहे. त्याच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव नेहमीच कसोटी किंवा एकदिवसीय स्वरूपात दिसून आला आहे, परंतु जेव्हा क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरूपाचा विचार केला जातो तेव्हा तो अतुलनीय आहे आणि या स्वरूपातील त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे त्याला युनिव्हर्स बॉस ही पदवी मिळाली. त्याने आरसीबीसाठी आरसीबीसाठी ६६ चेंडूत नाबाद १७५ धावांची खेळी केली होती. या खेळीबाबत बोलताना ख्रिस गेलने हा विक्रम कोणता खेळाडू मोडू शकतो, याबद्दल सांगितले आहे.

टी-२० क्रिकेटमधील त्याचे रेकॉर्ड हेच सांगतात की तो खरोखरच या फॉरमॅटचा लीजेंड आहे. टी-२० क्रिकेटमध्ये गेलने ४६२ सामन्यांमध्ये २२ शतकांसह १४५६२ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रमही आहे. गेलने आयपीएल २०१३ मध्ये पुणे वॉरियर्स इंडिया विरुद्ध आरसीबीसाठी ६६ चेंडूत नाबाद १७५ धावांची खेळी केली होती.

आरोन फिंच (१७२), हॅमिल्टन मसाकाद्झा (१६२), ब्रेंडन मॅक्युलम (१५८) आणि अलीकडेच डीवाल्ड ब्रेविस (१६२) टी-२० क्रिकेटमधील त्याच्या डावाच्या अगदी जवळ आले, पण त्याचा सर्वात मोठा खेळीचा विक्रम मोडू शकले नाहीत. जगातील सध्याच्या फलंदाजांमध्ये सूर्यकुमार यादव किंवा जोस बटलर हे असे खेळाडू आहेत, जे गेलचा नाबाद १७५ धावांचा विक्रम मोडू शकतात. हे अनेक माजी दिग्गजांचे मत असले, तरी खुद्द ख्रिस गेलची विचारसरणी वेगळी आहे. जिओ सिनेमावरील लीडपेजेस स्पीक शो दरम्यान ख्रिस गेलने आपला विक्रम मोडू शकणाऱ्या फलंदाजाचे नाव सांगितले आहे.

हा खेळाडू मोडणारा गेलचा विक्रम –

तो म्हणाला की, केएल राहुल हा असा फलंदाज आहे, ज्याच्यामध्ये त्याचा विक्रम मोडण्याची क्षमता आहे. राहुलसोबत आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्जकडून खेळलेल्या गेलने सांगितले की, राहुलमध्ये तसे करण्याची क्षमता आहे. जर त्याने मोठे शतक झळकावले, तर तो ही कामगिरी करू शकतो. कारण जेव्हा तो मैदानात उतरतो तेव्हा तो खरोखर धोकादायक असतो.

हेही वाचा – MS Dhoni: ४१ व्या वर्षीही धोनी कसतोय कंबर, फिटनेसचं रहस्य आलं समोर, रॉबिन उथप्पाने सांगितला डाएट प्लॅन

ख्रिस गेल म्हणाला की, केएल राहुल एक दिवस हे करू शकतो. फलंदाजी करताना तो १५ ते २० षटकांपर्यंत पोहोचला, तर डेथ ओव्हर्समध्ये तो आणखी धोकादायक ठरतो. जर त्याने सामन्यात चांगली सुरुवात केली आणि मोठे शतक केले, तर तो १७५ पर्यंत पोहोचू शकतो. तो म्हणाला की, विक्रम मोडण्यासाठी बनतात आणि एक दिवस ते घडेल. कोणास ठाऊक, पण आयपीएलमधील भारताचा सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारा केएल राहुल (नाबाद १३२) कदाचित ही कामगिरी करू शकेल.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 22:01 IST