scorecardresearch

क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धा : चेल्सीची ऐतिहासिक जेतेपदावर मोहोर

चेल्सीची क्लब विश्वचषक जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली असून त्यांनी प्रत्येक क्लब फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदावर किमान एकदा नाव कोरले आहे.

अतिरिक्त वेळेच्या अखेरच्या काही मिनिटांत काय हॅवर्ट्झने पेनल्टीवर केलेल्या निर्णायक गोलमुळे चेल्सीने पाल्मेरेसला २-१ असे नमवून क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवली.

चेल्सीची क्लब विश्वचषक जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली असून त्यांनी प्रत्येक क्लब फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदावर किमान एकदा नाव कोरले आहे. त्यामुळे चेल्सीने यंदा मिळवलेले यश ऐतिहासिक ठरले. 

हॅवर्ट्झच्या गोलमुळे चेल्सीने मँचेस्टर सिटीवर १-० अशी सरशी साधत मागील वर्षी मे महिन्यात चॅम्पियन्स लीगचे अजिंक्यपद मिळवले. त्यानेच पाल्मेरेसविरुद्ध ११७व्या मिनिटाला पेनल्टीद्वारे निर्णायक गोल झळकावला. त्याआधी अबू धाबी येथे झालेल्या अंतिम सामन्यात चेल्सीचा पहिला गोल रोमेलू लुकाकूने (५४वे मिनिट) झळकावला. पाल्मेरेसचा एकमेव गोल राफाएल वेगाने (६४वे मिनिट)केला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Club world cup football tournament chelsea historic win akp

ताज्या बातम्या