scorecardresearch

“जोपर्यंत मला क्रिकेट…”; टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केल्या भावना

टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ नुकताच संपला. त्यांच्या कारकिर्दीत टीम इंडियाने अनेक उंची गाठल्या.

Ravi Shastri will return as a commentator for upcoming India vs South Africa series
रवी शास्त्री

टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ नुकताच संपला. त्यांच्या कारकिर्दीत टीम इंडियाने अनेक उंची गाठल्या. रवी शास्त्री आणि विराट कोहली या जोडीनं रेड बॉल क्रिकेटमध्ये जवळपास सर्वच देशात विजय प्रस्थापित केला. रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने एकूण ४३ कसोटी सामने खेळले असून २५ सामन्यात विजय मिळवला आहे. तर १३ सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्याचबरोबर ५ सामने अनिर्णित ठरले आहेत. रेड बॉल व्यतिरिक्त व्हाईट बॉल क्रिकेटमध्येही टीम इंडियाचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे. रवी शास्त्री यांच्या कारकिर्दीत टीम इंडियाने एकूण ७९ एकदिवसीय सामने खेळले. त्यापैकी ५३ सामन्यात विजय मिळवला आहे. तर २३ सामन्यात पराभव सहन करावा लागला आहे. दोन सामने अनिर्णित ठरले आहेत. त्याचबरोबर टी २० क्रिकेटमध्ये एकूण ६८ सामने खेळले. त्यापाकी ४४ सामन्यात विजय, तर २० सामन्यात हार पत्कारावी लागली. तर दोन सामने अनिर्णित ठरले. रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात टीम इंडियाची घोडदौड सुरुच होती. मात्र आयसीसीचा कोणताही किताब जिंकता आला नाही. याची सळ माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्या मनात कायम आहे. आता माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी निवृत्तीनंतर काही दिवसांनी ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“आता कळले…या अदभुत प्रवासाचा भाग झाल्याबद्दल धन्यवाद. जोपर्यंत मला क्रिकेट पाहता येत आहे, तोपर्यत मी या आठवणी जपत राहीन आणि भारतीय संघाला पाठिंब देत राहीन.”, असं ट्वीट माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी केलं आहे.

दुसरीकडे, शास्त्री आयपीएलमध्ये दिसणार आहेत. आयपीएलचा १५वा हंगाम २०२२ मध्ये खेळवला जाणार आहे. नव्या हंगामात संघांची संख्याही आठ वरून दहा होईल. अहमदाबाद आणि लखनऊ या स्पर्धेत दोन नवीन फ्रेंचायझी जोडणार आहेत. CVC कॅपिटल्सने रवी शास्त्री यांची अहमदाबाद संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. भरत अरुण हे गोलंदाजी प्रशिक्षक, तर आर श्रीधर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. मात्र, याबाबत रवी शास्त्री आणि अहमदाबाद फ्रेंचायझीकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-11-2021 at 16:53 IST

संबंधित बातम्या