प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांनी आठवणी जागवल्या

‘‘पृथ्वी अवघ्या तीन वर्षांचा होता, त्यावेळी मी त्याला पहिल्यांदा पाहिले. महापालिकेच्या एका मैदानावर तो खेळत होता.  वय कमी असल्यामुळे पृथ्वीला मुंबईत कुणीही क्रिकेट खेळायला घेत नव्हते. त्यावेळी मी त्याला माझ्या गोल्डन स्टार अकादमीमध्ये प्रवेश दिला आणि पृथ्वी हा माझा पहिला विद्यार्थी ठरला,’’ असे पृथ्वीचे पहिले प्रशिक्षक संतोष पिंगुळकर सांगत होते.

पृथ्वीला विद्यार्थी म्हणून का निवडले, यावर पिंगुळकर म्हणाले की, ‘‘पृथ्वी फलंदाजी करताना काही फटके सहजपणे खेळत होता. तो तीन वर्षांचा असला तरी त्याच्या खेळामध्ये नजाकत होती. त्यावेळी मी त्याच्या वडिलांशी चर्चा केली आणि सप्टेंबर २००२मध्ये

त्याला माझ्या अकादमीमध्ये प्रवेश दिला. त्यानंतर तो दररोज माझ्याकडे सराव करायला यायचा. त्यानंतर त्याने रिझवी शाळेत प्रवेश मिळवला.’’

पृथ्वी भारताच्या वरिष्ठ संघातूनही खेळेल यात शंका नाही. पृथ्वी सुदैवी आहे, कारण त्याला राहुल द्रविडसारख्या व्यक्तीचे मार्गदर्शन मिळत आहे. द्रविड यांनी त्याला संधी दिली आणि त्याने त्याचे सोने केले.

–  संतोष पिंगुळकर, पृथ्वीचे प्रशिक्षक