Shaheen Afridi teased by Indian fans : टी-२० विश्वचषकात आज सर्वात रोमांचक सामना होत आहे. भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज थेट लढत होत आहे. न्यूयॉर्कमध्ये सायंकाळी ८ वाजता नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्यावर जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आहे. मागच्यावेळेस जेव्हा टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते, तेव्हा भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहीन आफ्रिदीसमोर भारतीय फलंदाज गारद झाले होते. यावेळीही शाहीन आफ्रिदीवर सर्वांच्या नजरा असतील. तत्पूर्वी त्याचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये भारतीय चाहते त्याला बॉलिंग कशी टाकावी, याचे सल्ले देत आहेत.

PHOTOS : IND vs PAK टी-२० विश्वचषकात आतापर्यंत सात वेळा आमनेसामने, पाहा दोन्ही संघांची कामगिरी

Basit Ali on BCCI and ICC Over Champions Trophy 2025
“Jay Shah म्हणतील तसंच ते करतात”, माजी पाकिस्तानी क्रिकेटरचे ICCवर मोठे वक्तव्य; “म्हणाले, BCCI कडे खूप पैसा म्हणून…”
Will the Indian team go to Pakistan for the Champions Trophy
आयसीसीच्या बोर्डरूममध्ये भारत वि. पाकिस्तान! चँपियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाईल?
IND vs PAK Women's Asia Cup 2024
Women’s T20 Asia Cup 2024 : भारत-पाकिस्तान सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
Pakistan beats Indian champions by 68 runs
लेक आणि जावयासमोर शाहिद आफ्रिदीचा शानदार खेळ, पाकिस्तानची भारतीय चॅम्पियन्सवर ६८ धावांनी मात
Taskin Ahmed was punished for sleeping
भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी झोपणं बांगलादेशच्या खेळाडूला पडलं महागात, संघाने दिली मोठी शिक्षा, आता मागतोय माफी
Loksatta explained Who will win the India vs South Africa final in Twenty20 World Cup cricket tournament
भारत वि. दक्षिण आफ्रिका…दोन्ही संघ ठरवले गेले ‘चोकर्स’…अंतिम फेरीत बाजी कोणाची?
Inzmam Ul Haq Accused India of Ball Tampering in IND v AUS
“भारताने बॉलसह…” पाकिस्तानच्या इंझमाम उल हकचा भारतीय संघावर मोठा आरोप, म्हणाले- “अर्शदीपला १५ व्या षटकात…”
Gulbadin Naib fake injury
AFG v BAN: दुखापतीचा बनाव अफगाणिस्तानच्या गुलबदीनच्या अंगलट येणार? आयसीसीचे नियम काय सांगतात?

भारतीय चाहत्यांची आफ्रिदीला गळ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये भारतीय चाहते आफ्रिदीबरोबर सेल्फी घेताना दिसत आहेत. या चाहत्यांमधील एकजण सांगतो की, आम्ही पंजाबी आहोत आणि कॅनडाच्या वँकूवर येथून खास हा सामना पाहण्यासाठी आलो आहोत. शाहीन आफ्रिदीला भेटून आम्हाला आनंद होतोय. हा चाहता फोटो काढून जाता जाता शाहीन आफ्रिदीला म्हणतो, “लक्षात ठेव चांगली बॉलिंग करायची नाहीये आणि विराट-रोहितला तुझा मित्र समज.”

हा व्हिडीओ न्यूयॉर्कच्या जगप्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरमधील असल्याचे दिसते. शाहीन आफ्रिदी याठिकाणी शॉपिंगसाठी आला असताना भारतीय चाहत्यांनी त्याला घेरले आणि त्याच्यासह फोटो काढून घेण्याची संधी साधली.
या व्हिडीओमध्ये शाहिन आफ्रिदीही दिलखुलासपणे चाहत्यांच्या प्रतिक्रियेला दाद देताना दिसत आहे. चाहते थट्टा करतायत, हे त्याला कळतं, त्यामुळे तो हसून त्यांना दाद देतो.

टी-२० विश्वचषकातील सर्वात मोठा सामना म्हणून आजच्या सामन्याकडे पाहिले जात आहे. न्यूयॉर्कमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या स्टेडियममध्ये आजचा सामना होत आहे. यासाठी ३४ हजार प्रेक्षक बसतील, अशी सोयही करण्यात आली आहे. गट ‘अ’ मध्ये असलेल्या भारताने आयर्लंडशी पहिला सामना सहज जिंकला. तर पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात युएसए सारख्या नवख्या संघाकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आज पाकिस्तान त्वेषाने उतरून विजय मिळविणार की भारत आपली यशस्वी घोडदौड सुरू ठेवणार, हे पाहण्यासाठी क्रिकेट चाहते आतूर झाले आहेत.