Copa America 2021 : अर्जेंटिनाचा बोलिवियावर शानदार विजय तर उरुग्वेला पॅराग्वेने विजयासाठी झुंजवलं

अ गटामध्ये अर्जेंटीना अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या स्थानावर उरुग्वे आहे तर तिसऱ्या स्थानावर पॅराग्वेचा संघ आहे. ब गटामध्ये ब्राझील पहिल्या क्रमांकावर आहे.

Copa America 2021 argentina vs bolivia and uruguay vs paraguay
दोन्ही सामन्यांचे अपेक्षित निकाल लागले. (फोटो ट्विटरवरुन साभार)

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत सोमवारी मध्य रात्री झालेल्या सामन्यांमध्ये अपेक्षित निकाल लागले. उरुग्वे विरुद्ध पॅराग्वे सामना उरुग्वेने तर बोलिविया विरुद्ध अर्जेंटिना सामना अर्जेंटिनाने जिंकला. या दोन सामन्यांमध्ये एकूण सहा गोल्स झाले. उरुग्वेने १-० च्या आघाडीने पॅराग्वेविरुद्धचा सामना जिंकला. तर बलाढ्य अर्जेंटिनाने ४-१ ने बोलिवियाचा धुव्वा उडवला.

नक्की वाचा >> Euro 2020 : डोळ्यांचं पारणं फेडणार सामना… फ्रान्स स्पर्धेबाहेर; स्वित्झर्लंडने ९३ वर्षानंतर केला ‘हा’ भीमपराक्रम

उरुग्वे विरुद्ध पॅराग्वे सामना अटीतटीचा झाला. या सामन्यात उरुग्वेचा सहज विजय होईल असं मानलं जात होतं. मात्र पॅराग्वेने त्यांना चांगालच झुंजवलं. पहिल्या सत्राच्या २१ व्या मिनिटाला उरुग्वेच्या एडीन्सन कवानीने मारलेला गोल हा निर्णयाक ठरला. २१ व्या मिनिटाला झालेल्या या गोल व्यतिरिक्त सामन्यात एकही गोल झाला नाही. दोन्ही संघांकडे चेंडूचा ताबा जवळजवळ समान कालावधीसाठी होता. उरुग्वेने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न करत तब्बल सहा वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला. तर शॉर्ट ऑन टार्गेटमध्ये पॅराग्वेचा स्कोअर शून्यच होता. पॅराग्वेने बचावात्मक खेळाला प्राधान्य दिल्याचं पहायला मिळालं. उरुग्वे सामन्यात ५०६ वेळा चेंडू पास केला तर पॅराग्वेने ५३९ वेळा.  उरुग्वेने या स्पर्धेमधील चार सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. एका सामन्यात त्यांचा पराभव झालाय तर एक सामना अनिर्णित राहिलाय.

नक्की पाहा >> VIDEO : पराभवानंतर रोनाल्डोने मैदानात असं काही केलं की चाहतेही झाले भावूक

दुसरीकडे बोलिविया विरुद्ध अर्जेंटिना सामन्यामध्ये एकूण पाच गोल्स झाले. त्यापैकी बोलिवियाने एक तर अर्जेंटिनाने चार गोल केले. सामन्याच्या पहिल्या सत्रामध्येच अर्जेंटिनाने ३-० ची आघाडी घेतली. अर्जेंटिनाच्या संघाच्या सामन्याच्या सहाव्या मिनिटालाचं आपलं गोल्सचं खातं उघडलं. त्यानंतर लिओनेल मेसीने ३३ आणि ४२ व्या मिनिटाला दोन गोल करत आघाडी ३-० वर नेली. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये बोलिवियाने संघर्ष सुरु ठेवत सत्र सुरु झाल्यानंतर १५ व्या मिनिटाला म्हणजेच सामन्याच्या ६० व्या मिनिटाला आपला पहिला आणि सामन्यातील एकमेव गोल नोंदवला. मात्र त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांनी म्हणजेच सामन्याच्या ६५ व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या लाऊटारो मार्टेनिजने गोल करत दोन्ही संघांमधील गोलचं अंतर तीनवर नेऊन ठेवलं. या विजयासहीत अर्जेंटीनाने अ गटामध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे. अर्जेंटिनाने स्पर्धेमध्ये आतापर्यंत चार सामने खेळले असून त्यापैकी तीन सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे तर एका सामन्यात ते पराभूत झालेत.

नक्की वाचा >> ‘सोनी’वाले दारु पिऊन हे दाखवतायत का?; शिफालीच्या वयासंदर्भातील गोंधळावरुन चाहत्यांकडून ट्रोलिंग

अ गटामध्ये अर्जेंटीना अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या स्थानावर उरुग्वे आहे तर तिसऱ्या स्थानावर पॅराग्वेचा संघ आहे. चौथ्या स्थानावर चिलीचा संघ असून पाचव्या स्थानी बोलिवियाचा संघ आहे. दुसरीकडे ब गटामध्ये ब्राझील अव्वल स्थानी आहे. ब्राझीलनेही अर्जेंटीनाप्रमाणेच चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. पेरु, कोलंबिया, इक्वेडोर आणि व्हेनेझुएला हे संघ अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Copa america 2021 argentina vs bolivia and uruguay vs paraguay results scsg

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या