कोपा डेल रे चषक

चॅम्पियन्स लीगच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या लिओनेल मेसीच्या बार्सिलोनाला कोपा डेल रे चषक फुटबॉलचे विजेतेपद मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. शनिवारी मध्यरात्री होणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांच्यासमोर अ‍ॅथलेटिक बिलबाओचे आव्हान असेल. दोन आठवड्यांपूर्वीच झालेल्या २०१९-२० हंगामाच्या अंतिम लढतीत रेयाल सोशियादादने बिलबाओला १-० असे नमवले. त्यामुळे यंदाच्या हंगामातील जेतेपदाच्या सामन्यात ते अधिक जिद्दीने खेळतील. अन्सू फॅटी आणि फिलिप कोटिन्हो दुखापतीमुळे या सामन्याला मुकण्याची शक्यता असल्याने बार्सिलोनाची चिंता वाढली आहे.

बार्सिलोनाने आतापर्यंत ३० वेळा, तर बिलबाओने २३ वेळा ही स्पर्धा जिंकली असून उभय संघ २०१४-१५ नंतर प्रथमच अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत.

*  वेळ : मध्यरात्री १ वा.

*  थेट प्रक्षेपण : सोनी लिव्ह अ‍ॅप