“…तर मी संघाबाहेर केवळ पाणी देत राहिलो असतो”

शेन वॉटसनने सांगितली आपबिती

Coronavirus lockdown : करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. लवकरात लवकर क्रीडा स्पर्धा सुरू व्हाव्यात आणि नवोदित खेळाडूंना संधी मिळावी, अशी भावना सर्व क्रीडापटूंच्या मनात आहे. भारतीय खेळाडूंसोबतच परदेशी खेळाडू हळूहळू IPL च्या आयोजनाचा आग्रह धरताना दिसत आहेत, पण अद्याप करोनाचा फैलाव आणि प्रार्दुभाव कमी होण्याचे चिन्ह नाही. त्यामुळे यंदाचे IPL रद्द होण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर शेन वॉटसन याने गेल्या IPL मधील त्याची एक आठवण सांगितली आहे.

दुर्दैवी अंत! क्रीडाविश्व टिपणाऱ्या फोटोग्राफरचे करोनामुळे निधन

“चेन्नईच्या संघात १० सामन्यात तुम्ही चांगली कामगिरी न करताही तुम्हाला पुढील सामन्यात संधी मिळते. गेल्या वर्षी माझी कामगिरी चांगली झाली नव्हती, पण कर्णधार धोनी आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. इतर कोणत्याही दुसऱ्या संघात असतो, तर थेट संघाबाहेरचा रस्ता दाखवला असता आणि इतर खेळाडूंना पाणी नेण्यासाठी सांगितलं असतं”, असे वॉटसनने सांगितले.

अरे देवा! या शोएब अख्तरचं करायचं तरी काय? पुन्हा झाला ट्रोल

“… तर IPL खेळण्यात काय अर्थ आहे”

वॉटसन पुढे म्हणाला की मी CSK मध्ये असताना मी फलंदाजी चांगली करत होतो, पण मला धावा काढता येत नव्हत्या. असं बऱ्याच सामन्यांमध्ये झालं. काही सामन्यांनंतर तर मला पण वाटू लागलं की मला आता बाकावर बसावं लागणर. पण त्यांनी मला अजिबात संघाबाहेर केले नाही. मला संधी देत राहिले आणि अखेर अंतिम सामन्यात माझी कामगिरी चांगली झाली. माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे मी संघाला गरज असताना चांगली कामगिरी करू शकलो. असं नेृतत्वकौशल्य असणं महत्त्वाचं असतं.

धोनी आणि स्टीफन फ्लेमिंग या दोघांचा मी आयुष्यभर ऋणी राहिन, असेही वॉटसनने नमूद केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Coronavirus lockdown ipl memories shane watson tells he will be thankful forever to ms dhoni csk fleming amid covid 19 vjb