World Test Championship : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ७ जून ते ११ जून दरम्यान लंडनमध्ये खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) ने बुधवारी १९ मार्चला टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा केली आहे. ज्यामध्ये एकाहून एक खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. भारताच्याही तीन खेळाडूंना संधी मिळाली आहे. ज्यामध्ये ऋषभ पंत, रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन आश्विनच्या नावाचा समावेश आहे.

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत जबरदस्त प्रदर्शन केलं. त्यामुळे टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. यामध्ये पंत, जडेजा आणि आश्विनचं मोठं योगदान होतं. अंतिम सामन्यात ऋषभ पंत खेळताना दिसणार नाही. कारण अपघातामुळं ऋषभ पंतला दुखापत झाली. त्यामुळे ऋषभ पूर्णपणे रिकव्हर झाला नाहीय.

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Afghanistan Cricketer rashid khan
क्रिकेटने अफगाणिस्तानमधील जनता आनंदी – रशीद खान
Pooja Vastrakar's Controversial Post
पंतप्रधान मोदींची टीम वसूली टायटन्स! महिला क्रिकेटरच्या पोस्टने उडाली खळबळ, ट्रोल होताच मागितली माफी
India Vs Pakistan bilateral series
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका होणार? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजनासाठी व्यक्त केली इच्छा

नक्की वाचा – PBKS vs RCB: IPL मध्ये कोहलीचा ‘विराट’ विक्रम; ‘अशी’ कामगिरी करणारा बनला आयपीएलमधील एकमेव फलंदाज

ऋषभ पंतने १२ सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. याचदरम्यान ४३.४० च्या सरासरीनं ८६८ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतकांचाही समावेश आहे. १४६ हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. रविंद्र जडेजानेही १२ सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. त्याने चमकदार कामगिरी करत दोन शतकांच्या जोरावर ६७३ धावा केल्या. तसंच गोलंदाजीतही कमाल दाखवत ३ इनिंगमध्ये पाच विकेट्स घेत एकूण ४३ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्यामाध्यमातून जाहीर केलेली WTC टीम ऑफ द टूर्नामेंट

उस्मान ख्वाजा, दिमुथ करुणारत्ने, बाबर आझम, जो रूट, ट्रॅविस हेड, रविंद्र जडेजा, ऋषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन आश्विन, पॅट कमिन्स (कर्णधार), कगिसो रबाडा आणि जेम्स एंडरसन