Cricket Australia Playing 11: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची प्लेईंग ११ निवडली आहे. या संघाच्या कर्णधारपदी दक्षिण आफ्रिकेला चॅम्पियन बनवणाऱ्या तेंबा बावूमाची निवड केली आहे.

तेंबा बावूमाच्या नेतृत्वाखाली खेळताना दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच आयसीसी ट्रॉफी उंचावली आहे. यासह काही दिवसांपूर्वीच झालेल्या भारत – दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत भारतीय संघावर २-० ने एकतर्फी विजयाची नोंद केली होती. या प्लेईंग ११ मध्ये भारतीय संघातील ४ खेळाडूंना स्थान दिलं आहे.क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडलेल्या प्लेईंग ११ मध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेड आणि भारताचा विश्वास फलंदाज केएल राहुलची निवड केली आहे.

ट्रॅव्हिस हेडने ऑस्टेलियासाठी सलामी करताना दमदार शतकं झळकावली आहेत. तर दुसरीकडे केएल राहुलने देखील ८१३ धावा केल्या आहे.हाया दोघांसह मधल्या फळीत फलंदाजी करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जो रूट, शुबमन गिल आणि तेंबा बावूमाची निवड केली आहे. रूटने यावर्षी कसोटी क्रिकेट खेळताना ५०.३१ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर शुबमन गिलने देखील लागोपाठ शतकं झळकावून ९८३ धावा केल्या आहेत.

तर तेंबा बावूमाने देखील ३१० धावा केल्या आहेत. या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी तेंबा बावूमाकडे सोपवण्यात आली आहे. तर यष्टिरक्षक फलंदाज म्हणून ॲलेक्स कॅरीला संघात स्थान देण्यात आलं आहे. यासह बेन स्टोक्सचा अष्टपैलू खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. गोलंदाज म्हणून मिचेल स्टार्कला प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत स्टार्कचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. तर जसप्रीत बुमराह, स्कॉट बोलँड यांना देखील संघात स्थान देण्यात आलं आहे. फिरकी गोलंदाज म्हणून सायमन हार्मरचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर १२ वा खेळाडू म्हणून रवींद्र जडेजाचा समावेश करण्यात आला आहे.