scorecardresearch

Premium

Cricket Australia: डब्ल्यूटीसी २०२१-२३ साठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडला संघ; विराट-रोहितला वगळत ‘या’ खेळाडूंना दिले स्थान

WTC 2021 and 23 Team: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसी २०२१-२३ साठी अनधिकृत संघ निवडला आहे. ज्यामध्ये बाबर आझमला स्थान मिळाले आहे, परंतु रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना संघातून वगळण्यात आले आहे.

Cricket Australia selected squad for WTC 2021-23
विराट आणि रोहित (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Cricket Australia selected squad for WTC 2021-23: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून खेळला जाणार आहे. हा सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळला जाईल, परंतु त्यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पर्धेसाठी एक अनधिकृत संघ निवडला आहे. या संघात, सीएने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२३ सायकलमध्ये कसोटी क्रिकेट खेळलेल्या संघातील खेळाडूंची निवड केली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडलेल्या संघात ऑस्ट्रेलिया आणि भारताचे प्रत्येकी तीन, इंग्लंडचे दोन आणि पाकिस्तान, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…

बाबर आझमला संघात स्थान देताना विराट-रोहितला वगळले –

सीएने निवडलेल्या संघात भारतीय दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना स्थान देण्यात आले नाही. भारतीय खेळाडूंमध्ये ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांचा समावेश आहे. या संघात पाकिस्तानच्या बाबर आझमला स्थान दिले आहे. त्याचबरोबर सीएने या संघात इंग्लंडच्या जो रूट आणि अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला स्थान दिले आहे.

कर्णधार म्हणून पॅट कमिन्सची केली निवड –

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सला या संघाचा कर्णधार बनवले आहे. त्याचबरोबर भारताच्या ऋषभ पंतचा यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून संघात समावेश केला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडलेल्या या संघात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील तीन खेळाडूंचा समावेश आहे, त्यात सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स यांचा समावेश आहे. पॅट कमिन्स हा सध्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. श्रीलंकेचा सलामीवीर दिमुथ करुणारत्नेला या संघात स्थान देण्यात आले, तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाही या संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.

हेही वाचा – IND vs AUS: डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी विराटबद्दल व्यक्त केल्या भावना, आयसीसीने शेअर केला VIDEO

डब्ल्यूटीसी २०२१-२३ साठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडलेला संघ –

उस्मान ख्वाजा, दिमुथ करुणारत्ने, बाबर आझम, जो रूट, ट्रॅव्हिस हेड, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत (विकेटकीपर), आर अश्विन, पॅट कमिन्स (कर्णधार), कगिसो रबाडा, जेम्स अँडरसन.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cricket australia skips virat kohli and rohit sharma to name babar azam in squad for wtc 2021 and 23 vbm

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×