भारत-पाकिस्तानमधील संबंध क्रिकेटमुळे सुधारतील – अफ्रिदी

भारत आणि पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी असले तरी त्यांच्यामधील सलोख्याचा मार्ग २२ यार्डातून जातो, असे म्हटले जाते

भारत आणि पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी असले तरी त्यांच्यामधील सलोख्याचा मार्ग २२ यार्डातून जातो, असे म्हटले जाते, याचाच पुनर्उच्चार पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने केलो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध क्रिकेटमुळे सुधारू शकतात, असे त्याने म्हटले आहे.
‘‘‘भारत व पाकिस्तान यांच्यातील सामने नेहमीच चुरशीचे होत आले आहेत. भारतामध्ये मी जेवढा क्रिकेटचा आनंद उपभोगला, तसा आनंद अन्य कुठेही मिळाला नाही. आम्हा दोन शेजाऱ्यांमधील नाते सलोख्याचे असायला हवे. फक्त क्रिकेटमुळेच हे नाते अधिक चांगले होऊ शकते,’’ असे आफ्रिदी म्हणाला.
आयपीएलमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंचा समावेश पाहायला मिळत नाही, याबाबत आफ्रिदी म्हणाला की, ‘‘तुम्ही हा प्रश्न मला विचारू नका, हा प्रश्न तुम्ही भारतीय सरकारला विचारायला हवा.’’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cricket can bring improvement in indo pak ties shahid afridi