विस्डेनच्या ‘क्रिकेटर्स ऑफ द ईअर २०२२’ पुरस्कारांची घोषणा झाली आहे. जगभरातील एकूण पाच खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो. या पाच खेळाडूंपैकी दोन खेळाडू भारतीय आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाची मान उंचावली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह अशी या दोन भारतीय खेळाडूंची नावं आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित आणि बुमराह यांच्याव्यतिरिक्त न्यूझीलंडचा फलंदाज ड्वेन कॉनवे, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन तसेच दक्षिण आफ्रिकेची महिला क्रिकेटर डेन व्हॅन निकर्क या तीन परदेशी खेळाडूंचीही विस्डेनच्या ‘क्रिकेटर्स ऑफ द ईअर २०२२’ या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. विस्डेनने अधिकृतपणे ही घोषणा केली आहे. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबद्दलची सर्व माहिती देण्यात आली आहे.

जगातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला?

या पाच खेळाडूंव्यतिरिक्त इंग्लंडचा क्रिकेटपटू जो रुटला जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून, तर दक्षिण आफ्रिकेची महिला क्रिकेटपटू लिझेल ली हिला सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा यष्टीरक्षक आणि फलंदाज मोहम्मद रिझवान याला टी-२० क्रिकेटमधील जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आलं.

जसप्रीत बुमराहची कामगिरी

मागील वर्षी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. यावेळी लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने सामना जिंकला होता. त्यानंतर ओव्हल येथील सामन्यातही बुमराहने नेत्रदीपक कामगिरी करुन दाखवली होती. या विजयासह भारताने २-१ अशी आघाडी मिळवली होती. बुमराहच्या धडाकेबाज कामगिरीमुळे भारताला हे शक्य झाले होते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील उर्वरित मालिका या वर्षी जुलै महिन्यात होणार आहे.

हेही वाचा : विश्लेषण: आयपीएलमध्ये करोना नियम काय आहेत? किती खेळाडूंसोबत संघ मैदानात उतरु शकतो?

जगातील सर्वोत्तम पुरुष आणि महिला खेळाडूंची नेमकी कामगिरी काय?

जो रुटने कसोटी क्रिकेटमध्ये वर्षभरात १७०८ धावा केल्या आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. जगातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा मान मिळालेल्या लिझेल ली हिनेदेखील दमदार खेळी केली. तिने भारताविरोधात चार सामन्यांमध्ये २८८ धावा केल्या. तसेच २०२१ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिने ९०.२८ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. याच कारणामुळे तिला सर्वोत्तम महिला क्रिकेटचा मान मिळाला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket news jasprit bumrah rohit sharma amongs wisdens five cricketers of the year prd 96 pbs
First published on: 22-04-2022 at 15:13 IST