Cricket rules explained regarding bowler punishment after fatal injury: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज फिलिप हय़ुजेस आठवतो का? हो तोच फलंदाज ज्याला क्रिकेटच्या मैदानावर डोक्याला चेंडू लागून आपला जीव गमाववा लागला होता. पण क्रिकेटमध्ये डोक्याला चेंडू लागण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. अशा घटना होऊ नयेत, म्हणून आयसीसीने हेल्मेट घालणं आणि नेक गार्ड अनिवार्य केलं. आता कुठलाही फलंदाज हेल्मेटशिवाय फलंदाजीला जाऊच शकत नाही. चुकून चेंडू हेल्मेटला लागला, तरी सामना थांबवला जातो आणि फिजिओ मैदानात येऊन फलंदाजाची विचारपूस करतात. अनेकांना असा प्रश्न पडतो की, चेंडू लागून जर फलंदाजाचा मृत्यू झाला तर गोलंदाजाला शिक्षा होऊ शकते का? काय सांगतो नियम? जाणून घ्या.

नियम काय सांगतो?

कुठल्याही खेळात खेळाडूला दुखापत होण्याची शक्यता खूप जास्त असते. पण क्रिकेटमध्ये दुखापतीसह जीव जाण्याचीही भीती असते. कुठलाही वेगवान गोलंदाज जास्तीत जास्त वेगाने गोलंदाजी करण्याच्या प्रयत्नात असतो. त्याचं उद्देश्य फलंदाजाला बाद करणं असतं. पण कधी कधी चेंडूच्या उसळीचा आणि वेगाचा अंदाज येत नाही. त्यामुळे चेंडू संवेदनशील ठिकाणी लागण्याची भीती असते. अनेकदा खेळाडूंना आपला जीव गमवावा लागतो. क्रिकेटच्या मैदानावर असं काही घडलं, तर हा केवळ एक अपघात असतो. त्यामुळे गोलंदाजाला कुठलीही शिक्षा होत नाही.

कुठल्याही देशाचा कायदा हेच सांगतो की, जर कोणाचाही नैसर्गिक मृत्तू किंवा संशयास्पद मृत्यू झाला, तर पोलीस किंवा संबंधित अधिकारी प्राथमिक चौकशी करू शकतात. पण क्रिकेटच्या मैदानावर असं काही घडलं, तर हा केवळ एक अपघात असतो. पण गोलंदाजी करत असलेल्या गोलंदाजाने हे जाणीवपूर्वक तर केलेले नाही किंवा मग गुन्हेगारी कृत्य तर नव्हते ना, याची खात्री करण्यासाठी पोलीसांकडून तपास केला जाऊ शकतो.

जर गोलंदाजाने टाकलेला चेंडू लागून फलंदाजाचा मृत्यू झाला, तर आयसीसीकडून काही कारवाई केली जाऊ शकते का?

माध्यमातील वृत्तानुसार, जर गोलंदाजाने चेंडू क्रिकेटच्या नियमानुसार टाकला असेल तर हा केवळ एक अपघात मानला जाईल. आयसीसीच्या नियमानुसार, गोलंदाजावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही. यासह गोलंदाजावर कुठलाही बॅन लावला जाणार नाही. पण जर अंपायरला वाटत असेल की, गोलंदाजाने फलंदाजाला दुखापतग्रस्त करण्याच्या हेतूने चेंडू टाकला असेल, तर अंपायर त्याला गोलंदाजी करण्यापासून थांबवू शकतात. यासह तो गोलंदाज त्या सामन्यात पुन्हा गोलंदाजी करू शकणार नाही.