scorecardresearch

T-20 World Cup: शफाली युवा महिला संघाची कर्णधार

सलामी फलंदाज शफाली वर्मा दक्षिण आफ्रिकेत १४ ते २९ जानेवारीदरम्यान होणाऱ्या ‘आयसीसी’ १९ वर्षांखालील महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी सोमवारी घोषित करण्यात आलेल्या १५ सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व करेल.

T-20 World Cup: शफाली युवा महिला संघाची कर्णधार
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

नवी दिल्ली : सलामी फलंदाज शफाली वर्मा दक्षिण आफ्रिकेत १४ ते २९ जानेवारीदरम्यान होणाऱ्या ‘आयसीसी’ १९ वर्षांखालील महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी सोमवारी घोषित करण्यात आलेल्या १५ सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व करेल. अखिल भारतीय महिला निवड समितीने १९ वर्षांखालील महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेशिवाय १७ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध सुरू होणाऱ्या आगामी द्विपक्षीय मालिकेसाठीही संघाची निवड केली.

२०१९ मध्ये भारताच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात पदार्पण केल्यानंतर दोन कसोटी, २१ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि ४६ ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी १८ वर्षीय शेफाली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेतही संघाचे नेतृत्व करेल. सर्व पाच सामने प्रिटोरिया येथे २७, २९, ३१ तसेच, २ आणि ४ जानेवारीला खेळवण्यात येतील. १९ वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेत १६ संघ सहभाग नोंदवणार असून भारत दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि स्कॉटलंडसह ड-गटात आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना २९ जानेवारीला पार पडेल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी संघ :

शफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), ऋचा घोष, जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, रिषिता बासु, सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पाश्र्वी चोप्रा, तितास साधू, फलक नाझ, शबनम एमडी, शिखा, नजला सीएमसी, यशश्री

१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी संघ :

शफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत, ऋचा घोष, जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, रिषिता बासु, सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पाश्र्वी चोप्रा, तितास साधू, फलक नाझ, शबनम एमडी राखीव खेळाडू : शिखा, नजला सीएमसी, यशश्री.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या