नवी दिल्ली : सलामी फलंदाज शफाली वर्मा दक्षिण आफ्रिकेत १४ ते २९ जानेवारीदरम्यान होणाऱ्या ‘आयसीसी’ १९ वर्षांखालील महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी सोमवारी घोषित करण्यात आलेल्या १५ सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व करेल. अखिल भारतीय महिला निवड समितीने १९ वर्षांखालील महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेशिवाय १७ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध सुरू होणाऱ्या आगामी द्विपक्षीय मालिकेसाठीही संघाची निवड केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१९ मध्ये भारताच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात पदार्पण केल्यानंतर दोन कसोटी, २१ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि ४६ ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी १८ वर्षीय शेफाली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेतही संघाचे नेतृत्व करेल. सर्व पाच सामने प्रिटोरिया येथे २७, २९, ३१ तसेच, २ आणि ४ जानेवारीला खेळवण्यात येतील. १९ वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेत १६ संघ सहभाग नोंदवणार असून भारत दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि स्कॉटलंडसह ड-गटात आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना २९ जानेवारीला पार पडेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket under 19 women team is led by shafali verma icc ysh
First published on: 06-12-2022 at 00:02 IST