Ind vs Pak : रोहित शर्मा चमकला, सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्थान

८५ चेंडूमध्ये केली शतकी खेळीची नोंद

भारतीय संघाचा सलामीवीर सध्याच्या विश्वचषक स्पर्धेच चांगल्याच फॉर्मात आहे. सलामीच्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावल्यानंतर, रोहितने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही शतकी खेळीची नोंद केली आहे. पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेताना रोहित शर्माने ८५ चेंडूमध्ये शतकाची नोंद केली. या कामगिरीसह रोहित शर्मा विश्वचषक स्पर्धेत सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे.

या यादीमध्ये विरेंद्र सेहवाग ८१ चेंडूत झळकावलेल्या शतकासह पहिल्या स्थानावर आहे.

अवश्य वाचा – Ind vs Pak : रोहितकडून पाकच्या गोलंदाजांची धुलाई, मानाच्या खेळाडूंच्या पंगतीत मिळवलं स्थान

दरम्यान, सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना रोहित शर्माने लोकेश राहुलच्या सोबतीने शतकी भागीदारी रचली. पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी रचत रोहितने भारताला आक्रमक सुरुवात करुन दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cricket world cup 2019 ind vs pak rohit sharma creates another record with a splendid century psd

ताज्या बातम्या