विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला घरचा रस्ता दाखवणारा न्यूझीलंड संघ अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडकडून पराभूत झाला. न्यूझीलंडने २४१ धावा करून इंग्लंडला २४२ धावांचे आव्हान दिले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक बाऊंड्री (चौकार-षटकार) मारण्याच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आला. याबाबत सुपर ओव्हर टाकणारा ट्रेंट बोल्ट याने भावना व्यक्त केला आहे.

“आम्हाला इंग्लंडहून न्यूझीलंडला येण्यासाठी खूप वेळ लागला. विमान प्रवास खूप मोठा होता, पण तरीदेखील अंतिम सामन्यातील पराभव विसरणे शक्य झालेले नाही. मला अपेक्षा होती की मी त्यातून बाहेर येईन, पण तसं अजून तरी झालेलं नाहीये. काही गोष्टी या कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी दीर्घ काळ लक्षात राहतात”, असे बोल्ट म्हणाला.

मूळ सामन्यात शेवटच्या षटकात जयंत ओव्हर थ्रो च्या धावा गेल्या. त्याबाबतही बोल्टने उत्तर दिले. तो म्हणाला की सामन्यात अशा छोट्या छोट्या गोष्टींचा खूप फरक पडतो. तो ओव्हरथ्रो चा चौकार गेला नसता तर निकाल वेगळा लागू शकला असता. ते शेवटचे षटक अजूनही माझ्यात डोक्यात आहे. मला हवेतून नव्हे, तर जमनींवरुन षटकार मारण्यात आला जे या आधी कधीच घडले नव्हते याचा विचार मी सर्वात जास्त करत आहे. त्याहूनही पुढची गोष्ट म्हणजे दोनही संघांची धावसंख्या समान होती. तरीदेखील आम्ही सामना पराभूत झालो ही गोष्ट पचनी पडणे कठीण जात आहे.

दरम्यान, सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण सलामीवीर हेन्री निकोल्स (५५) आणि टॉम लॅथम (४७) यांच्याव्यतिरिक्त कोणीही जबाबदारीने खेळ केला नाही. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. पण बेन स्टोक्स आणि जोस बटलर या दोघांनी मोठी भागीदारी करून इंग्लंडला विजयासमीप नेले.स्टोक्सने शेवटपर्यंत तग धरून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत (१५ धावा) सुटला, त्यामुळे मूळ सामन्यातील चौकार षटकारांच्या निकषावर इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला.