scorecardresearch

श्रीलंकेविरुद्धच्या खेळताना भारताचा सलामीवीर इशान किशनच्या हेल्मेटवर आदळला वेगवान चेंडू अन्…

भारतीय संघासाठी वाईट बातमी आहे. श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात फलंदाजी करताना भारताचा सलामीवीर फलंदाज इशान किशनला दुखापत झाली.

भारतीय संघासाठी वाईट बातमी आहे. श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात फलंदाजी करताना भारताचा सलामीवीर फलंदाज इशान किशनला दुखापत झाली. लाहिरू कुमारचा वेगवान चेंडू हेल्मेटवर आदळला आणि इशान किशन जमिनीवर बसल्याचं पाहायला मिळालं. या चेंडूचा वेग ताशी १४७ किमी इतका होता. यानंतर इशानला तातडीने रुग्णालयात दाखल करावं लागलं.

इशान किशनला दुखापत झाली असली तरी रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्राथमिक उपचारानंतर त्याला लगेच सोडण्यात आलं. उपचारानंतर त्याने फलंदाजी सुरू ठेवली. त्याने १५ चेंडूत १६ धावा केल्या. यानंतर इशानला कांगराच्या फोर्टिस रुग्णालयात भरती करण्यात आलं. या ठिकाणी त्याच्या तपासणी करण्यात आल्या. तपासणीत गंभीर दुखापत नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याला सुट्टी देण्यात आली.

हेही वाचा : विश्लेषण : ‘ऑस्ट्रेलियात निर्णय माझे, श्रेय दुसऱ्याचे’, अजिंक्य रहाणेचा रोख कोणाकडे?

इशानला रुग्णालयातून सुट्टी मिळाली असली तरी त्याला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे इशानला श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सुट्टी मिळण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व Cricket ( Cricket ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cricketer ishan kishan injured while playing against sri lanka t 20 match pbs

ताज्या बातम्या