India vs South Africa Test Match Score 2nd Test Day 2: भारत आणि दक्षिण अफ्रिकेमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज शार्दुल ठाकूरने भेदक गोलंदाजी केली. शार्दुलने या इनिंगमध्ये एकूण ७ विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे दक्षिण अफ्रिकेचा संघही मैदानात पाय रोवून उभा राहिला. अफ्रिकेने २२९ धावा करत भारताच्या २०२ धावांचा टप्पा ओलांडला. यासह अफ्रिकेने २७ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या इनिंगला उतरलेल्या भारतीय संघाने दुसरा दिवस अखेर २ विकेट गमावत ८५ धावा केल्या. त्यामुळे आता भारताला ५८ धावांची आघाडी मिळाली.

३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना जोहान्सबर्गच्या वांडरर्स मैदानावर खेळला जात आहे. आज (४ जानेवारी ) खेळाचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण अफ्रिकेने १८ षटकांमध्ये एक विकेट गमावत ३५ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी अफ्रिकेने सर्वबाद २७ धावांची आघाडी घेतली आणि मग दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. त्यात भारताने ८५ धावा करत ५८ धावांची आघाडी घेतली.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs LSG: विराट कोहलीला आऊट करत घेतली आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट, कोण आहे मनिमरण सिध्दार्थ?
Rishabh becomes first player to play 100th match for Delhi
IPL 2024 : ऋषभ पंतने झळकावले अनोखे ‘शतक’, दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

हेही वाचा : India vs South Africa 2nd Test Day 1: पहिल्या दिवशी भारताचा संपूर्ण संघ २०२ धावांवर बाद, दक्षिण अफ्रिकेलाही एक झटका

भारतीय संघाची पहिली इनिंग

प्रथम फलंदाजी करायला आलेल्या भारतीय संघाकडून कर्णधार के. एल. राहुलने सर्वाधिक ५० धावा केल्या. दुसरीकडे रवीचंद्रन अश्विनने ४६ धावांची खेळी केली. दक्षिण अफ्रिकेच्या मार्को यानसनने ४, डुआने ओलीविअर आणि कगिसो रबाडाने प्रत्येकी ३ विकेट घेतल्या.

दक्षिण अफ्रिका पहिली इनिंग

दक्षिण अफ्रिकेच्या संघातून किगन पिटरसनने ६२ धावा केल्या. याशिवाय टेंबा बावुमाने देखील ५० धावांची अर्धशतकी खेळी केली.

भारताची दुसरी इनिंग

दुसऱ्या इनिंगमध्ये भारताने २ बाद ८५ धावा केल्या. कर्णधार के. एल. राहुल ८ धावा करून बाद झाला. मयांक अगरवालला देखील केवळ २३ धावाच करता आल्या. दिवसअखेर मैदानावर चेतेश्वर पुजारा ३५ धावांवर, तर अजिंक्य रहाणे ११ धावांवर नाबाद होते.

भारतीय कसोटी संघ

के. एल. राहुल (कर्णधार), मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्वीन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), मोहम्मद सिराज